parali maratha kranti morcha | Sarkarnama

परळीतले आंदोलन स्थगितीच्या मार्गावर; आंदोलक - प्रशासनात चर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

बीड : परळी येथे मागील एकवीस दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन स्थगितीच्या मार्गावर आहे. न्यायालय आदेशाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. सात) दुपारी आंदोलक आणि प्रशासनात चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी द्यावा यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी परळीत ता. 18 जुलै रोजी पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. यानंतर सुरु झालेले ठिय्या आंदोलन एकवीस दिवसांपासून सुरु आहे. 

दरम्यान, परळीतल्या आंदोलनामुळे राज्यात मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु झाले. आंदोलनाला हिंसक वळण आणि या मागणीसाठी समाजातील युवकांनी बलिदान देण्याच्या घटनाही घडल्या. परळीतले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत न्यायालयाने आंदोलनाबाबत व्यक्त केलेल्या मतावरुन मंगळवारी परळीतील आंदोलक आणि प्रशासनात चर्चा झाली. यावरुन आंदोलन स्थगितीच्या मार्गावर आहे. चर्चेनंतर आंदोलन मंडपात आंदोलनातील प्रमुखांकडून आंदोलन स्थगित करण्याबाबत मत व्यक्त होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख