पप्पू कलानी तीन वर्षांनंतर उल्हासनगरमध्ये

पप्पू कलानी याची 17 दिवसांसाठी पॅरोलवर सुटका झाली आहे. त्याची मुलगी सीमा हिचे शनिवारी लग्न असून, त्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. कलानी चार वर्षांनंतर उल्हासनगरात येणार आहे.
पप्पू कलानी तीन वर्षांनंतर उल्हासनगरमध्ये

उल्हासनगर : पप्पू कलानी याची 17 दिवसांसाठी पॅरोलवर सुटका झाली आहे. त्याची मुलगी सीमा हिचे शनिवारी लग्न असून, त्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. कलानी चार वर्षांनंतर उल्हासनगरात येणार आहे. 

2013 मध्ये पप्पू कलानी याला इंदर बठीजा यांच्या हत्याकांड प्रकरणात कल्याणच्या जलदगती न्यायालयाने जन्मठेप सुनावलेली आहे. त्यानंतर त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा तुरुंगात केली होती. प्रकृती कारणास्तव त्याला तळोजा रुग्णालयात हलवले होते. 

मुलीचे लग्न असल्याने पप्पू कलानी याची पॅरोलवर सुटका करावी, अशी याचिका त्यांचे चिरंजीव ओमी कलानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. 4 नोव्हेंबरला या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला नाही. त्यात लग्न जेमतेम दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने कलानी यांची पॅरोलवर सुटका होणार की नाही, या सवालाने कलानी परिवार अस्वस्थ झाला होता. शेवटी काल न्यायालयाने पॅरोलची याचिका मंजूर केल्याने तीन वर्षांनंतर कलानी उल्हासनगरात दाखल होत आहे. 

गेल्या वर्षी कलानी याच्या बहिणीचे निधन झाले होते. तेव्हा अंत्यसंस्कार व पुढील विधीसाठी उपस्थित राहता यावे यासाठी केलेली पॅरोलसाठीची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com