Pappu Kgde aiming for Kaij assembly | Sarkarnama

रामदास आठवलेंचे विश्वासू पप्पू कागदेंना वाढल्या केजबाबत आशा

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केज मतदार संघात दौरे वाढविले आहेत. विजयासाठी तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

बीड : रिपाईंचे २२ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष आणि आता सात वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदासह युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशा दोन जबादाऱ्या पार पाडत असलेल्या केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू पप्पू कागदे यांनी केज मतदार संघातून उमेदवारी मिळण्याचा विश्वास वाढला आहे. त्यांनी विजयासाठी कामाला लागा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

केज मतदारसंघात भाजपच्या संगीता ठोंबरे या विद्यमान आमदार आहेत .   जेथे भाजपचे आमदार आहेत त्या जागा मित्र पक्षांना सोडण्याच्या मनस्थितीत भाजपचे नेते नाहीत . त्यामुळे संगीता ठोंबरे यांची जागा आठवले गटाला सुटू शकेल का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा  आहे . पण पप्पू कागदे आशावादी आहेत . 

 

Image result for sangita thombre facebook

महायुतीतील घटकपक्षांमध्ये रिपाईंला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. रामदास आठवले यांनी भाजपसमोर जागा मागणीच्या ठेवलेल्या प्रस्तावात केज मतदार संघाचाही समावेश आहे. पप्पू कागदे हे रामदार आठवले यांचे निकटवर्तीय आणि खास विश्वासू मानले जातात.

पॅंथरचे शाखाध्यक्ष, रिपाईंचे शहराध्यक्ष आणि २२ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष आणि आता सात वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदासह त्यांच्यावर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशा दोन जबादाऱ्या असल्याने त्यांच्यावरील आठवले यांच्या विश्वासाची प्रचिती सहजच येऊन जाते. 

मागच्या पाच वर्षांत पप्पू कागदे किंवा जिल्ह्यातील रिपाईंला सत्तेचा काहीही वाटा मिळाला नाही. अगदी त्यांच्या एका सहकाऱ्याला मिळालेले जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपदाचाही त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपकडून यावेळी ही जागा सोडून जिल्ह्यातील रिपाईंला न्याय दिला जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. 

तर, आठवलेंचे विश्वासू असल्याने आठवले देखील जोर लाऊन पप्पू कागदे यांच्यासाठी ही जागा सोडवून घेतील अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. भूमिमुक्ती परिषद चळवळीच्या माध्यमातून पाच हजार एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या दलितांसाठी लढा उभारला आणि आतापर्यंत दोन हजार एकरांच्या सातबाराही त्यांनी मिळवून दिल्या आहेत.

दलित चळवळीत आघाडीवर असलेल्शस पप्पू कागदे यांचा इतर समाजाशीही सुसंवाद ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. जिल्ह्यात वा गाव पातळीवरील कुठल्याही कुरबुरी वा दोन समाजातील भांडणात समोपचाराने तोडगा काढण्यावर भर देण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्यासाठी जमेचे ठरतील, असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे.

 दरम्यान, आठवले आपल्यासाठी ही जागा सोडूवन घेतील असा विश्वास असल्याने पप्पू कागदे यांनी मतदार संघाचा दौरा करुन संपर्क वाढविला आहे. समविचारी पक्षाचे आणि इतर पक्षातील मित्र असलेल्या नेत्यांनाही त्यांनी मदतीसाठी साकडे घालण्यास सुरुवात केल्याने त्यांना जागा सुटण्याची खात्रीच वाटत असावी. विजयासाठी कामाला लागण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. आता वाटाघाटीत नेमके काय होते यावर पुढील चित्र अवलंबून आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख