Panvel Municipal corporation election campaign in summer | Sarkarnama

13 दिवसाच्या प्रचार कालावधीत कडक उन्हामुळे उमेदवारांची होणार ‘दमछाक’

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नवी मुंबई : कडक उन्हामुळे पनवेलकर घामाघूम झालेले असतानाच पनवेल महापालिकेचीपहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. उन्हामुळे अंगातून वाहणार्‍या घामाच्या
धारा आणि त्यातून मतदानासाठी करावे लागणारे संपर्क अभियान, त्यात प्रचारासाठीमिळणारा अवघा 13 दिवसाचा कालावधी या पार्श्‍वभूमी उमेदवाराची दमछाक होणार आहे.

नवी मुंबई : कडक उन्हामुळे पनवेलकर घामाघूम झालेले असतानाच पनवेल महापालिकेचीपहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. उन्हामुळे अंगातून वाहणार्‍या घामाच्या
धारा आणि त्यातून मतदानासाठी करावे लागणारे संपर्क अभियान, त्यात प्रचारासाठीमिळणारा अवघा 13 दिवसाचा कालावधी या पार्श्‍वभूमी उमेदवाराची दमछाक होणार आहे.

24 मे रोजी पनवेल महापालिकेकरिता पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत असून 26 मेरोजी मतमोजणी होत आहे. 29 एप्रिल ते 6 मेपर्यत उमेदवारांना अर्ज भरता येणार
असून 8 मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 11 मेपर्यत उमेदवारी मागेघेता येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस उलटल्यावरच निवडणूकीतील
त्या त्या प्रभागातील रणनीतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

त्यातच मेमहिन्याच्या अखेरच्या आठवड्यात महापालिकेकरता मतदान होत असून अनेक मतदार गावीगेले आहेत.
निवडणूकीच्या तारखा जाहिर होण्यापूर्वीच इच्छूकांनी मागील महिन्यापासूनच घरटीजनसंपर्क अभियानास सुरूवात केलेली आहे. यामध्ये शेकापआणि भाजपाचीच मंडळी
अग्रेसर आहेत. काही प्रभागामध्ये शिवसेना व काँग्रेसचेही इच्छूक कार्यरतअसल्याचे पहावयास मिळाले. उन्हाळ्यांची सुट्टी लागल्याने परप्रातिंय विशेषत:उत्तर भारतीय मतदार गावी गेले असून मतदानासाठी ते सुट्टी सोडून पुन्हा पनवेलला
येण्याची आशा राजकारण्यांनीही सोडून दिलेली आहे. त्यामुळे मराठी भाषिकमतदारांवरच राजकारण्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गावी गेलेल्यामतदारांचा गावचा पत्ता, संपर्क आणि कोणत्या कालावधीत  मतदार कोणत्या गावीभेटतील याचीही चाचपणी शेकाप आणि भाजपामधील इच्छूकांकडून सुरू झाली आहे.

मतदारांना गावावरून आणण्यापासून त्यांना पुन्हा गावी नेवून सोडण्यासाठी एशियाडबसेसचेही बुकींगचे प्रयास सुरू झाले आहेत.
हळदीकुंकूच्या माध्यमातून इच्छूकांनी संपर्क अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण केलाअसला तरी महिला मतदारच गावी गेले असल्याने राजकीय पक्षांची तारांबळ उडाली आहे.19 मे ते 25 मे या कालावधीत विवाह तिथीही असल्याने विवाहामध्ये अडकलेले मतदारव त्यांचे आप्तस्वकीय मतदानासाठी येण्याची शक्यता कमी आहे. निवडणूका तारखाजाहिर होताच काही तासातच राजकारण्यांनी मिडीया मॅनेजरचा शोध सुरू केल्याने
मिडीयामध्ये काम करणार्‍यांनाही निवडणूकीच्या निमित्ताने मिडीयातील घटकांनाकाही काळाकरिता ‘अच्छे दिन’ येणार आहेत.

निवडणूक प्रचार यंत्रणा सांभाळणार्‍या
 कंपन्यांचा शोध उमेदवारांनी सुरू केला आहे. मतदारयाद्या, प्रचाराच्या स्लीप, व्हॉटसअप् मॅसेज, व्हॉईस कॉलिंग, फेसबुकला बॅनर,घोषणा, प्रचाराचे मुद्दे, निवडणूक वचन नामे, मतदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक आदीकामे  या प्रसिध्दी कंपन्या करू लागल्याने उमेदवाराचे कष्ट काही प्रमाणात कमीझाले आहेत. उमेदवारांना फक्त संपर्क अभियानावर आणि नाराजांचे रूसवे-फुगवे काढण्याचे काम करावे लागणार आहे.

एकीकडे निवडणूक जिंकण्यासाठी करावे घरटी जनसंपर्क अभियान, त्यात इमारतींमधीलतळमजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यत करावी लागणारी पायपीट, सकाळी 10.30 पासून
दुपारी 5 वाजेपर्यत कडक उन्हाचा त्रास यामुळे उमेदवाराच्या नाकीनऊ येणार आहेत.त्यातच रात्री 10 वाजेपर्यतच प्रचाराची मुभा असल्याने सांयकाळी मिळणार्‍यादिवसभरातील जेमतेम पाच तासाचाच कालावधी उमेदवाराला मिळणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख