पनवेलच्या महापौरांना निवासस्थानाची प्रतीक्षा 

नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिका महापौरांच्या निवासस्थानाबाबत वादविवाद आणि राजकीय खल होत असतानाच पनवेलच्या महापौरांना महापौर निवास मिळणार का? मिळणार असेल तर कुठे? ज्या प्रशासनाने महापौरांना आणि सभापतींना दालने उपलब्ध करून देण्यासाठी महिनाभर वाट पाहायला लावली, ते प्रशासन महापौरांच्या त्यांच्या उर्वरित कारकिर्दीत महापौर निवास बांधून देईल का? असे प्रश्न पनवेलकरांना पडले आहेत.
पनवेलच्या महापौरांना निवासस्थानाची प्रतीक्षा 

नवीन पनवेल : नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिका महापौरांच्या निवासस्थानाबाबत वादविवाद आणि राजकीय खल होत असतानाच पनवेलच्या महापौरांना महापौर निवास मिळणार का? मिळणार असेल तर कुठे? ज्या प्रशासनाने महापौरांना आणि सभापतींना दालने उपलब्ध करून देण्यासाठी महिनाभर वाट पाहायला लावली, ते प्रशासन महापौरांच्या त्यांच्या उर्वरित कारकिर्दीत महापौर निवास बांधून देईल का? असे प्रश्न पनवेलकरांना पडले आहेत. 

याबाबत मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. मात्र शहर अभियंता संजय कटेकर यांनी सांगितले की, मनपाने या संदर्भात जागेचा शोध सुरू केला असून सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. 

सर्वच महानगरपालिकांच्या महापौरांना शासकीय निवासस्थान असते. अशा शासकीय निवासस्थानांची चर्चाही सर्वदूर पसरलेली असते. महानगरपालिकांच्या वर्गवारीनुसार तेथील महापौरांचे निवासस्थान असते. 

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत असल्याने महापौरांना राणीच्या बागेत निवासस्थान देण्यात आले आहे; मात्र मुंबईच्या महापौर तेथे राहायला जात नाहीत. 

तीच परिस्थिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाची आहे. तेथीलही महापौर तेथे राहायला जात नाहीत. प्रसारमाध्यमांमधील या बातम्या वाचून पनवेलच्या नाक्‍या-नाक्‍यावर पनवेल महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानाबाबत चर्चा झडत आहेत. 

पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल नवीन पनवेलमध्ये राहतात. जर का महापौर निवास बनले, तर त्या राहायला जातील का? असेही नागरिक विचारत आहेत. मात्र प्रशासन किती दिवसात महापौर निवास बांधून देणार, हा खरा अनुत्तरित प्रश्न आहे. 

महापौरांच्या शपथविधीनंतर महिनाभरानंतर त्यांना दालन उपलब्ध झाले. तीच गत विषय समित्यांच्या सभापतींच्या दालनांबाबत झाली. मनपाची महासभा फडके नाट्यगृहातच घ्यावी लागत आहे. प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. त्यामुळे प्रथम महापौरांची टर्म संपायच्या आता त्यांना महापौर निवासस्थान मिळेल का, असा प्रश्न सामान्य पनवेलकर विचारत आहे. 

महापौरांचे जनसंपर्क कार्यालय कुठेही नाही 
महापौरांचे जनसंपर्क कार्यालय कुठेही नसल्यामुळे नागरिकांना भेटण्यासाठी महापौर दालन हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नागरिकांना महापौरांना भेटण्यासाठी कार्यालय उपलब्ध नाही. 

पनवेलच्या महापौर मध्यमवर्गीय असल्याने त्यांच्या बंगल्यावर नागरिकांची रांगा लागणे दुरापास्त आहे; त्यामुळे त्यांच्या हक्काच्या निवासस्थानाची निर्मिती झाल्यास नागरिकांना संपर्क साधता येईल. याबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे स्वीय सहायक विनोद चौतमोल यांच्याशी चर्चा केली असता जनसंपर्क कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com