panvel election | Sarkarnama

भाजपा-रिपाइंचे पनवेलात शक्तीप्रदर्शन, अर्ज दाखल

सरकारनामा
रविवार, 7 मे 2017

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीकरता भाजप युतीच्या उर्वरित उमेदवारांनी शनिवारी शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4,5, आणि 6 साठी खारघर सेक्‍टर 13 मधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे भाजप युतीच्या उमेदवारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत युतीच्या उमेदवारांनी मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले. 

उमेदवारी अर्ज भरताना रिपाईचे जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कळंबोली गावातील श्री काळभैरव मंगल कार्यालय येथे भाजप युतीच्या उमेदवारांनी शनिवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले.पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7,8,9 , आणि 10 साठी निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांच्याकडे भाजप युतीच्या उमेदवारांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, अशोक मोटे, रामदास शेवाळे, बुधाजी ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले की, भाजपने सर्व समाजातील सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. भाजपमधील बंडखोरीबाबतच्या वावड्यांचा आता बुडबुडा झालेला आहे. कारण भाजपमध्ये कार्यकर्ते नाराज असले तरी पक्ष सोडून जाणार नाहीत असा मला विश्वास आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये झालेल्या विकासकामांच्या जोरावर हि निवडणूक भाजप जिंकणार आहे, असेही ते म्हणाले. 

यावेळी भाजपचे उमेदवार रामदास शेवाळे म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि पारदर्शी कारभार यासाठी मी भाजपमध्ये आलेलो आहे. रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता महानगरपालिकेवर आणण्याचा ठाम निर्धार केलेला आहे असे यावेळी सांगितले.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख