No Rights to Panvel Ward Committee Members
No Rights to Panvel Ward Committee Members

पनवेल पालिकेच्या प्रभाग समित्या नामधारी; अधिकार नसल्याने कामे होईना

पनवेल पालिकेची स्थापना 2016 साली झाली. वास्तविक पाहता ज्या पद्धतीने प्रशासन चालणे अपेक्षित होते. ते झाले नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. शहरात अ,ब,क,ड अशा चार प्रभाग समित्या पालिका हद्दीत आहेत. त्यांना लिपिक दर्जाचे प्रभाग अधिकारी देण्यात आले आहेत. वास्तविक पाहता याठिकाणी सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी असणे गरजेचे आहे. तसेच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये नागरिकांची सर्व कामे होणे अपेक्षित आहे

नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सभापतींना कोणतेही अधिकार नसल्यामुळे विकासकामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या प्रभाग समित्या केवळ नावापुरत्या असल्याचे दिसून येत आहे. तसेच लिपिक दर्जाच्या व्यक्तींना प्रभाग अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

त्यातच सिडको दाद देत नसल्याने स्थानिक नगरसेवकांनाही कामे करता येत नाही. याबाबत कामोठे येथील नगरसेवक विकास घरत यांनी थेट महासभेतच हा प्रश्न उपस्थित करीत खंत व्यक्त केली. दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी घरत यांनी प्रशासनाकडे केली आहे.

पनवेल पालिकेची स्थापना 2016 साली झाली. वास्तविक पाहता ज्या पद्धतीने प्रशासन चालणे अपेक्षित होते. ते झाले नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. शहरात अ,ब,क,ड अशा चार प्रभाग समित्या पालिका हद्दीत आहेत. त्यांना लिपिक दर्जाचे प्रभाग अधिकारी देण्यात आले आहेत. वास्तविक पाहता याठिकाणी सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी असणे गरजेचे आहे. तसेच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये नागरिकांची सर्व कामे होणे अपेक्षित आहे; परंतु पनवेलचे प्रभाग समिती कार्यालय नावापुरतेच आहे. 

पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात हे कार्यालय करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रभाग समिती सभापतींचीसुद्धा निवड करण्यात आली आहेत; मात्र त्यांना कोणतेही अधिकार दिले गेले नाहीत. सर्व कामकाज पनवेल येथील मुख्यालयातून होत असल्याने प्रभाग समिती कार्यालय, प्रभाग अधिकारी आणि सभापतींची निवड नेमकी कोणत्या कारणासाठी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पनवेल पालिका हद्दीत बहुतांश भाग सिडकोचा आहे. सिडकोच्या वसाहती अद्यापही हस्तांतरित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर, तळोजा, नावडे या सिडको वसाहतीमधील विकासकामांसाठी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत आयुक्‍त गणेश देशमुख यांनी सध्या सर्व अधिकार सिडकोकडे असून हस्तांतराची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

कामोठे मलनिःसारण केंद्राच्या ठेकेदाराची अरेरावी

कामोठे वसाहतीतील मलनिःसारण केंद्राची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा बिघडली असल्याने कामोठे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक केंद्रावर पाहणी करण्याकरता गेले असता संबंधित ठेकेदाराने अरेरावी केली. इतकेच नाही तर कामोठे पोलीस ठाण्यात नगरसेवकांवर तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

पालिकेच्या प्रभाग समित्या तयार करण्यात आल्या आहेत; मात्र प्रशासनाने त्यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. तसेच सिडको आणि पालिका यांच्यातील अधिकाराचे भिजत घोंगडे तसेच पडून आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न नगरसेवक म्हणून कोणाकडे घेऊन जायचे, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे - विकास घरत, नगरसेवक, पनवेल पालिका
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com