pankkaja munde | Sarkarnama

""गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे त्यामुळे त्यांनाच विचारा ''

सुचिता रहाटे: सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई : आमदार निवासातील बलत्कारप्रकरण हा विषय गृहविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करू शकत नाही." असे असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे म्हणणे आहे. गृहविभाग खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे यासंबंधी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बोला असे मुंडे यांनी सांगितले. मात्र नागपूर येथे आमदार निवासस्थानी एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होणे म्हणजे खरंच निंदनीय बाब आहे असे त्या म्हणाल्या. 

मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या "होमटाऊन" नागपूर येथे ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे या एक महिला असून ते महिला व बालविकास या मंत्रिपदावरही आहेत. तरीही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. नागपूरच्या आमदार निवासाचा गलिच्छ व भोंगळ कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकारने याप्रकरणी कसून चौकशी करून या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यातल्या महिला आमदारांनी केली आहे. मात्र या प्रकरणारवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मंत्री मुंडे यांनी नकार दिला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख