pankajtai will continue in bjp | Sarkarnama

पंकजाताई व्यथित पण, नाराज नाहीत : बबनराव लोणीकर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मुंबई : भाजपच्या फायरब्रॅंड नेत्या पंकजाताई मुंडे या व्यथित आहोत पण, नाराज नाहीत अशी माहिती माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. 

पंकजाताईंच्या नाराजीने भाजपला जोरदार धक्का बसला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी पंकजाताईंची पाठराखण करीत त्या नाराज नाहीत आणि त्या भाजप कदापी सोडणार नाहीत असे म्हटले होते. 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. भाजपमधील दिवंगत गोपिनाथ मुंडे यांना मानणारा गट सत्ता जाताच ऍक्‍टीव्ह झाला आहे. येत्या 12 डिसेंबररोजी गोपिनाथ गडावर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेणार असल्याचे स्वत:ता पंकजाताईनी म्हटले होते. दोन दिवसापासून भाजपतील राजकारण पंकजाताईंची भोवती फिरत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही त्यांची पाठराखण केली होती. 

आज भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी पंकजा मुंडे याबीची भेट घेतली आणि 1 तास चर्चा केली, यात पंकजा व्यथित आहे पण नाराज नाही असा लोणीकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, नाराज पंकजा मुंडे ला भेटण्यासाठी राम शिंदे आणि विनोद तावडे रॉयलस्टोन वर दाखल झाले आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख