पंकजाताई मुंडे भाजप सोडणार नाहीत, पिंपरीतील भाजप कार्यकर्त्यांना विश्वास

 पंकजाताई मुंडे भाजप सोडणार नाहीत, पिंपरीतील भाजप कार्यकर्त्यांना विश्वास

पिंपरीः स्व.गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमधील त्यांचे चाहते दरवर्षीच गोपीनाथगडावर जातात. मात्र,यावेळी पंकजा मुंडेंच्या भावनिक आवाहनामुळे ही संख्या वाढली आहे.\

दरम्यान, पंकजा या भाजपमध्येच राहणार असून उद्याच्या  मेळाव्यात त्या कसलाही वेगळा विचार करणार नाहीत, असे गोपीनाथगडाच्या दिशेने कूच करणाऱ्या मुंडे यांच्या शहरातील समर्थक पदाधिकाऱ्यांनी सरकारनामाला सांगितले.

पंकजा यांच्या नावातच कमळ आहे. त्यामुळे त्या पक्ष अजिबात सोडणार नाहीत,असे मुंडेंचे कट्टर समर्थक,पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक अॅड.मोरेश्वर शेडगे म्हणाले.तर,त्या पक्षावर नाही,तर एका नेत्यावर नाराज आहेत.त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत,असे माजी नगरसेवक  राजू दूर्गे यांनी सांगितले.

या दोघांसह माजी नगरसेवक रघुनंदन घुले, नगरसेविका योगिता नागरगोजे, भाजपचे शहर सरचिटणीस आणि प्रवक्ते अमोल थोरात,स्वीकृत नगरसेवक माऊली थोरात,कामगार नेते केशव  घोळवे व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशीव खाडे आदी स्व. मुंडेंचे निस्सीम चाहते हे आजच गोपीनाथगडाच्या दिशेने कूच करणार आहेत. दहा लक्झरी बस आताच बूक झाल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्यासह भाजपची काही नेतेमंडळी उद्याच्या या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांचे निस्सीम चाहते असलेले शहरातील भाजपचे जुने एकनिष्ठ पदाधिकारी,कार्यकर्ते व भगवानगडावरील दसरा मेळावा हे अतूट नाते होते. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर आता गोपीनाथगडाशी ते तयार झाले आहे.

दरवर्षी १२ डिसेंबरला शहरातील अंदाजे पाचशे मुंडे समर्थक गोपीनाथगडावर जातात.यावेळी,बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंकजाताईंनीच भावनिक आवाहन केल्यामुळे ही संख्या वाढल्याचे स्व. मुंडेंचे कट्टर समर्थक सदाशिव खाडे यांनी सांगितले. स्व. मुंडेंवर श्रद्धा असलेले त्यांचे दोन लाख चाहते  त्यांच्या गेल्या जयंतीला गडावर आले होते.यावेळी ही संख्या वाढेल,असे खाडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com