अभाविपच्या तिरंगा पदयात्रेचे पंकजा मुंडेंनी केले स्वागत - Pankaja Munde welcomes ABVP rally | Politics Marathi News - Sarkarnama

अभाविपच्या तिरंगा पदयात्रेचे पंकजा मुंडेंनी केले स्वागत

सरकारनामा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

.

बीड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बीड शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेचे स्वागत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड शहरात केले.

केंद्र सरकारने 370 कलम रद्द करून काश्मिरी जनतेला खरे स्वातंत्र्य दिले आहे, याबद्दल ही  तिरंगा पदयात्रा  अभावितर्फे काढण्यात आली  .  यात्रेच्या स्वागत सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे  यांनी ही यात्रा काढून देशप्रेम जागृत केल्याबद्दल अभाविपच्या पदाधिका-यांचे कौतुक केले.

स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले ते आपण विसरू शकत नाही. 370 कलम रद्द केल्याचा संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे. सर्व जाती धर्माच्या भिंती पाडून सब का साथ सबका विकास सबका विश्वास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुर्ण करण्यासाठी एकसंघ रहावे, एक सुरक्षित राष्ट्र निर्माण करावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख