सभेत गोंधळ होताच पंकजा म्हणाल्या, 21 तारखेला घड्याळ बंद पडलेले असेल!

सभेत गोंधळ होताच पंकजा म्हणाल्या, 21 तारखेला घड्याळ बंद पडलेले असेल!

पिंपरी : येत्या २१ तारखेला घड्याळ कायमचे बंद करायचे आहे. तसेच भ्रष्टाचारमुक्तीसाठी महाराष्ट्र एनसीपीमुक्त करायचा आहे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केले.

लोकसभेपेक्षा मोठा दणका  विधानसभेला एनसीपीला बसणार असल्याचे भाकित त्यांनी यावेळी केले. यावेळी एका महिलेने पंकजांच्या  भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. श्रोत्यांत बसलेल्या महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर पंकजांचे भाषण पुन्हा सुरु झाले.

पिंपरी-चिंचवडमधील महायुतीच्या विधानसभा निवडणूक प्रचार सभेत पंकजा बोलत होत्या.यावेळी शहरातील अनधिकृत बांधकामे व रिंगरोडचा प्रश्न सुटला नसल्याकडे त्यांचे लक्ष्य उभे राहत एका महिलेने वेधले. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे, अशी मागणीही तिने केली. आमच्या घरांचं काय अशी विचारणा रिंगरोडबाधित सदर महिलेसह आणखी दोघा-तिघांनी केली. त्यामुळे सभेत थोडासा गोंधळ झाला. भाजप कार्यकर्त्यांनी उत्तरादाखल मोठी घोषणाबाजी केली.त्यामुळे शांत राहण्याचे आवाहन पंकजांना करावे लागले. तसेच लोकशाहीत हे अपेक्षित आहे, असेही त्या म्हणाल्या.

यानंतर त्यांनी आणखी त्वेषाने भाषण करीत राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. ज्यांना येथे उमेदवार उमेदवार देता आला नाही,ते ही अशी माणसे पाठवित आहेत,असे त्या म्हणाल्या. घरांची विचारणा करणाऱ्यांना त्यांनी प्रतिप्रश्न केला. जे गेली २१ वर्षे येथे सर्वेसर्वा होते, त्यांनी काय केले. काही नाही. फक्त जातीपातीचं राजकारण केलं,अशी विचारणा करणाऱ्या पंकजांचा रोख हा अजित पवारांच्या दिशेने होता.

एनसीपीने त्यांच्या मानसिकतेतूनच ती हरल्याचे सिद्ध केलंय, असा हल्लाबोल पंकजांनी यावेळी केला. उपस्थित असलेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांचा उल्लेख त्यांनी इतिहास निर्माण करणारे खासदार असा केला.सगळी उमेदवारी स्वताच्या घरातच का अशी विचारणा करीत त्यांनी पवारांना लक्ष्य केलं.महायुतीचेच सरकार येणार असल्याने मत वाया घालवू नका, लोकसभेच्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे,असे आवाहन त्यांनी केलं.मराठा आरक्षण जे देऊ शकले नाहीत. ते आम्ही  दिले, असे सांगत पिंपरी-चिंचवडचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी स्वत पुढाकार घेणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com