पावसाने पाठ फिरविली असली तरी शासन पाठीशी : पंकजा मुंडेंकडून दिलासा

घाबरुन जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे. पावसाने पाठ फिरविली असली तरी शासन तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला मदत मिळवून देईन.- पंकजा मुंडे, ग्रामविकास व महिला आणि बालविकासमंत्री
पावसाने पाठ फिरविली असली तरी शासन पाठीशी : पंकजा मुंडेंकडून दिलासा

परळी वैजनाथ (जि. बीड) : "पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पण, घाबरुन जाऊ नका, धीर सोडू नका. पावसाने पाठ फिरविली असली, तरी शासन तुमच्या सोबत आहे. तुम्हाला मदत मिळवून देण्याची माझी जबाबदारी असून ती मी पार पाडेन,'' असा धीर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला.

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसावर बोंडआळी आणि ऊसावर हुमनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. रब्बी पेरणी अशक्य असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा - पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यातील दगडवाडी, टोकवाडी, तडोळी आदी गावांत जाऊन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी जळालेली पिके पाहून त्यांनी हुमनीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या ऊस पिकाचीही पाहणी केली. 

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीरही दिला. घाबरु नका, शासन आणि मी तुमच्या पाठीशी आहोत. पावसाने पाठ फिरविल्याने नुकसान झाले आहे. मात्र, खंबीरपणे आपण सर्वजन या आपत्तीवर मात करु. शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्यासोबत प्रशासनाचे अधिकारीही होते. दरम्यान, सोमवारी त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनीही दुष्काळी पाहणी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com