भावांनो जीव नका रे देऊ , आईवडिलांच्या चेहरा समोर ठेवा वाघांनो : पंकजा मुंडे

माझ्या महाराष्ट्रातील माझा एक भाऊ 'काका साहेब शिंदे' याने स्वतःचा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचं लेकरू गेलं ,तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दुःखाची कल्पना ही कोणी करू शकत नाही.-पंकजा मुंडे
Pankaja Munde
Pankaja Munde

पुणे : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते काकासाहेब शिंदे यांनी घेतलेल्या जलसमाधी बद्दल दुःख व्यक्त केले असून  भावांनो जीव नका रे देऊ .  आईवडिलांच्या चेहरा समोर ठेवा वाघांनो ,असे भावनिक आवाहन त्यांनी तरुणांना केले आहे .

तसेच  गुरुवारी आपण वाढदिवस साजरा करणार नाही असे जाहीर केले आहे .  पंकजा मुंडे आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहितात ," माझा वाढदिवस दरवर्षी मी अत्यंत साधेपणाने, माझ्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत साजरा करते ! यावर्षीही तसाच नियोजन होतं पण गेल्या काही दिवसातील घटनांनी मन विषष्ण झालं आहे . माझ्या महाराष्ट्रातील माझा एक भाऊ 'काका साहेब शिंदे' याने स्वतःचा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचं लेकरू गेलं ,तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दुःखाची कल्पना ही कोणी करू शकत नाही. मी सर्व सुन्न होऊन बघत आहे आणि अगदी जाणून बुजून प्रतिक्रिया देण्याची घाई ही केली नाही ." 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका मांडताना त्या म्हणतात ,"माझ्या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याचं समर्थन मुंडे साहेबांनी ही केलं होतं व आम्ही ही करतो ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व ओबीसीवर कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची देखील आहेच व माझीही आहे. हे एकत्र शक्य होऊ शकेल असा मला पुर्ण विश्वास आहे .यासाठी सर्वतोपरी  प्रयत्न करण्यासाठी आम्ही ,मुख्यमंत्री व शासन कटिबद्ध आहोत.आवश्यकता आहे ती धैर्याची !"

भावना, पीडा बाजूला ठेवून केवळ राजकीय भांडवल करणं मला कधी जमतच नाही , असे नमूद करून पंकजा मुंडे  पुढे म्हणतात ,"एका उमेदीने, जग बदलण्याचा जिद्दीने आम्ही तरुण राजकारणात आलो आहोत, वंचित, पीडित यांचं जीवन बदलण्यास काही करण्यासाठी आम्ही राजकारण करत आहोत. त्यात यशस्वी होण्यासाठी तशी शिवरायांच्या विचारातील पोषक समाज व्यवस्था हवी . या विषयी आजकाल चिंता वाटते पण सर्व पार पडेल कारण हा छत्रपतींचा ,शाहू महाराजांचा,महात्मा फुलेंचा,महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. माझी 'काकासाहेब शिंदे 'या माझ्या भावाला मनापासून श्रद्धांजली . या परिवाराच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे."

आपण  वाढदिवस साजरा करणार नाही असे स्पष्ट करताना पंकजा मुंडे लिहितात ,''सतत लोक शुभेच्छा देण्यासाठी येण्याची विचारणा करत आहे त्यामुळे कृपया नोंद घ्यावी मी वाढदिवस साजरा करणार नाही, पुष्पगुच्छ ,सत्कार स्वीकारणार नाही . मी 26 जुलै ला परळीत जाईन माझ्या वैद्यनाथाच दर्शन घेईन, समाजात प्रेम, सुख ,शांती,विकास नांदो ही माझी जवाबदारी यशस्वी करण्याची माझ्या प्रतिज्ञा पुर्तीसाठी मी जाईन ! मी लोकप्रतिनिधी म्हणून यासाठी कटीबद्ध आहे.परत कोणत्या घरचा दिवा विझू नये हीच अपेक्षा आहे..भावानो स्वतःचा जीव नका रे देऊ आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याला समोर ठेवा वाघानो." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com