बीड झेडपी पुन्हा ताब्यात घेण्यासाठी  पंकजा मुंडे सरसावल्या

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरी पंकजा मुंडे यांनी बोलविलेल्या बैठकीला शिवसेनेचे नेते सदस्यांसह हजर होते. जिल्हा परिषदेव पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला..
Pankaja Munde.preparing to win Beed ZP again
Pankaja Munde.preparing to win Beed ZP again

बीड : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. परंतु, सत्तेच्या जोरावर इतर सदस्यांची गोळाबेरीज करुन भाजपने सत्ता स्थापन केली. आता सत्ता गेल्यानंतर आणि पराभवानंतरही पुन्हा झेडपीत सत्तारोहणासाठी पंकजा मुंडेंनी एक पाऊल पुढे टाकले आहे. विशेष म्हणजे राज्यात ज्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी झाली त्या शिवसेनेचे स्थानिक नेते व सदस्यही पंकजा मुंडेंच्या बैठकीला हजर होते. दुसरीकडे झेडपी सत्तेबाबत राष्ट्रवादीत शांतताच आहे.


६० सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांना मतांचा अधिकार नाही तर संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे विधानसभेला विजयी झाल्याने त्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ५३ सदस्यांमधून नवा अध्यक्ष - उपाध्यक्ष आणि सभापती निवडले जाणार आहेत. मागच्या वेळी निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २६ सदस्य विजयी झाले होते. त्यांच्यासोबत संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीचेही तीन सदस्य होते. तसेच काँग्रेसचेही तिघे विजयी झाले होते. 

सत्तास्थापने ईतके संख्याबळ राष्ट्रवादीकडे असतानाही भाजपने राष्ट्रवादीचा स्वप्नभंग केला होता. पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने तत्कालिन राष्ट्रवादीचे धस, शिवसंग्राम, शिवसेना आणि काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली होती. आता नव्या समिकरणात सत्तास्थापनेसाठी केवळ २७ सदस्यांची गरज आहे. मात्र,  राष्ट्रवादीत शांतताच आहे. पक्षात जिल्ह्यात नेत्यांची संख्या अधिक असल्याने कोणी पुढाकार घ्यावा, त्यासाठी 'वेळ' कोणी खर्च करावा, असा प्रश्न असल्याचे बोलले जाते.

 विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी झाली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे चार सदस्य असून त्यांची साथ मिळाली तर राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकते असे गणित असले तरी अद्याप स्थानिक शिवसेना नेत्यांना सोबत घेण्याचा कोणहीही प्रयत्न केल्याचे आणि संपर्क केला नसल्याची माहिती आहे.


दुसरीकडे भाजप सत्तेत नसताना आणि पराभव झालेला असतानाही पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मंगळवारी त्यांनी
शिवसेनेचे बदामराव पंडित, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, राजेंद्र मस्के, अशोक लोढा आदी नेत्यांच्या सोबतीने सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीला २९ सदस्य उपस्थित होते. 

राज्यात काहीही समिकरणे असली तरी जिल्ह्यात आपण ठरवू तेच समिकरण घडणार हे पंकजा मुंडे यांनी शिवसेना नेत्यांना सोबत घेऊन दाखविले आहे. बैठकीत सत्ता स्थापनेचा निर्धार करण्यात आला. आता राष्ट्रवादी काही पावले उचलणार का, हे पाहवे लागणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com