पंकजा मुंडेंनी फडणविसांचे एकदाच नाव घेतले.....

pankaja munde about devendra fadnavis
pankaja munde about devendra fadnavis

पुणे : कमळाच्या फुलात गोपीनाथ मुंडे यांची समाधी आहे. मी बंड करणार? कोणाविरुद्ध करणार, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी राज्यभर सभा घेत फिरत होते, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात त्यांनी फक्त एकदाच फडणवीस यांचे नाव घेतले. ते पण याच वाक्याच्या वेळी. ``तुम्ही मला वाघिण म्हणता. पण विरोधकांच्या फार पोटात दुखतयं. मी आता आमदार नाही. नगरसेवकही नाही. आमदार मेघना बोर्डीकर आल्यात का? ये बेटा. मोनिका राजळे आल्यात का? ये माझी बहिण, मोनिका. आता इतर आमदारांची नावे घेत नाही. त्यात फार वेळ जाईल. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत भाजपचा एकएक आमदार निवडून येण्यासाठी मी बाहेर प्रचार करत होते. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर झालेला होता. मी देवेंद्र फडणवीसला (त्यांनी येथे एकेरी उल्लेख केला.) मुख्यमंत्री करण्यासाठी एकेक आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार? मी कशामुळे बंड करणार? कोणाविरुद्ध करू? मी नाराज आहे का, असे विचारतात. माझी कोणाकडून अपेक्षाच नाही. माझा बाप (मुंडे यांच्या समाधीकडे बोट करत) तेथे बसलाय. माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे,``अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

योगेश टिळेकर, हर्षवर्धन पाटील आणि विनायक पाटील यांच्या सभांना मी जाऊ शकले नाही. त्यांचा पराभव झाला.  माझ्या तीन सभा हेलिकाॅप्टर बिघाडामुळे रद्द झाल्या. माझ्या सभा न झाल्यामुळे ते पडले, असे मला म्हणायचे नाही. तुम्ही म्हणाल मीच पडले आहे. तुमच्या सभांनी कोण निवडून येणार? पण मी अखेरपर्यंत भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. एकेक आमदार निवडून आणण्यासाठी आणि पक्षाने सांगितलेला मुख्यमंत्री आणण्यासाठी मी फिरत होते, असे त्यांनी सांगितले. 

पक्ष कुणाच्या मालकीचा नसतो ती एक प्रकिया असते. मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यत पोहचवला, पदाशिवाय हे वैभव कमावणे येड्या गाबाल्याचे काम नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी आपण भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

पंकजा म्हणाल्या, ''अजित पवारांनी बंड केल्यावर सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून वाईट वाटले, कारण घर फुटल्याच्या वेदना मी भोगलीय. पण नंतर सगळ्यांचे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सगळ्यांचे स्वागत करतांना त्या दिसल्या. मुंडे साहेबांना संघर्ष करावा लागला, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हे पाहून देवा तू जातीयवादी आहेस का? असा प्रश्न मला विचारावा वाटतो. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सात वंजारा उमेदवार दिले, आणि भाजपने फक्त एक.'' चूक झाली तर कान धरून सांगा ,असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक मी गोपीनाथ गडावर कमळात उभे केले आहे, आता त्या कमळावर बुलडोझर चालवू का?

हा पक्ष माझा आहे, याचा पुनरुच्चार करतांनाच पंकजा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोरच संताप व्यक्त केला. सत्ता नसताना कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, त्यासाठी मी काम करणार, दरवाजा लावून बसणार नाही, वाघीण आहे, जंगल सोडून जाणार नाही असा विश्वास देखील पंकजा यांनी आपल्या समर्थकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com