दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंनी सुचविली पावणेसात हजार कोटींची योजना

मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी माजलगाव धरणातआणून ते उपखोऱ्यांत वळवावे अशी मागणी शुक्रवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
CM-&-Pankajatai.
CM-&-Pankajatai.

बीड : मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाव मात करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सहा हजार सातशे कोटी रुपये खर्चाचा पर्याय सुचविला आहे.

जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून ते पाणी सिंधफणा, कुंडलिका, वाण, मनार व मांजरा उपखोऱ्यात वळविण्यात यावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

याबाबत लगेचच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मराठवाड्यातील धरणे पांच वर्षातून एखाद्या वर्षी भरतात. सिंचनाची खात्रीशीर सोय नसल्याने हा भाग कायम दुष्काळी असतो. नाशिक जिल्ह्यात पडणा-या पावसाचे अंदाजे दहा हजार ४५४ दलघमी पाणी पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे समुद्राकडे वाहून जाते.

तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूस ६२३ लहान-मोठी धरणे असल्यामुळे जायकवाडी प्रकल्प देखील प्रत्येक वर्षी पुर्ण क्षमतेने भरत नाही.

यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राकडे वाहून जाणारे तीन हजार १७८ दलघमी पाणी गोदावरी खो-यात आणणे प्रस्तावित आहे.  यापैकी ५७०  दलघमी पाणी जायकवाडी धरणस्थळी उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा दुष्काळग्रस्त मराठवाड्याला होईल असे या पत्रात पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. 

 जायकवाडी धरण ते सिंधफणा नदीला  जोडणारा जलदगती प्रवाही कालवा ७० किमी पर्यंत काढावा, मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, व मनार प्रकल्पाचे  स्थैर्यकरण करण्यासाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळवावे.

त्यामुळे बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, कंधार, रेणापूर, चाकूर, बिलोली व मुखेड तालुक्यात नवीन सिंचन योजना हाती घेता येतील.

यासाठी सहा हजार ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. श्रीमती मुंडें यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ यासंदर्भात बैठक बोलावली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com