आता शिवसेना आणि दोन्ही कॉंग्रेसवर टीका कशी करू: पंकजा मुंडे

जनतेचे मनामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशीइच्छा होती परंतु तीदुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही . मात्र मी कधीही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे म्हटले नव्हते . -पंकजा मुंडे
Pankaja-Munde asks question to her party
Pankaja-Munde asks question to her party

 पुणे : सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली आहे.  मात्र भिन्न विचारसरणी असलेल्या या पक्षांवर एकत्र आल्याबद्दल टीका कशी करू असा प्रश्न मला पडतो, असे भाजपचे नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले

भाजपने गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर त्यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचार असे विचारण्यात आले असता पंकजा मुंडे बोलत होत्या . पंकजा मुंडे  म्हणाल्या आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र कसे आले यावर टीका करणे मला अवघड वाटते. 


देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळी भल्या पहाटे झालेल्या शपथविधी विषयी बोलताना त्या म्हणाल्या, 
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती . राष्ट्रपती राजवट किती काळ  ठेवायची ?  याशिवाय ओल्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर झाला होता . त्यामुळे जनतेने आपल्याला जर निवडून दिलेले आहे तर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत या भावनेतून देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार स्थापन केले असावे ,असे माझे मत आहे.  त्यांनी एकट्याने  हा निर्णय घेतला असेल असे मला वाटत नाही .  पक्षाच्या हाय कमांडलाही त्यांनी   विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी सल्लामसलत करूनच निर्णय  घेतलेला असेल असे मला वाटते. 


पण आपल्या पक्षाची विचारसरणी काय?  आपला पक्ष पार्टी विथ डिफरन्स असे म्हणतो तर मग  पण सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करणे योग्य आहे काय असे विचारले असता त्या म्हणाल्या,  मी स्वतः आयडियालॉजीला  टॉप प्रायॉरीटी देते .  मात्र पक्षाने घेतलेला निर्णय योग्य की आयोग्य उत्तर मी देऊ शकत नाही.  मला असे वाटते की राष्ट्रपती राजवट संपवण्यासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी हा  निर्णय घेण्यात आलेला होता. 


एका प्रश्नाचे उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे कधीही म्हटले नव्हते . मराठवाड्यात एकाच कॉलेजमध्ये राजीव सातव यांच्या बरोबर मी कार्यक्रमाला उपस्थित होते. तेंव्हा  राजीव सातव असे म्हणाले होते की, तुम्ही बहुजन नेत्या  आहात आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हावे असे आम्हाला वाटले होते .


  त्यावर बोलताना मी असे म्हटले होते की , जनतेचे मनामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी   इच्छा होती परंतु ती  दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही . मात्र मी कधीही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे म्हटले नव्हते . आणि मी एवढी अपरिपक्वही नाही . त्यामुळे मी असेकाही  बोलण्याचा प्रश्नच येत नाही. 

 मात्र अशा प्रकारचे अनेक प्रवाद - वावड्या माझ्याविषयी उठवण्यात आल्या . त्यामुळे माझे नुकसान झाले असे मला वाटते . मला काही महत्त्वाचे  पद किंवा गोष्ट मिळण्याची वेळ असेल त्या काळामध्ये या वावड्या उठलेल्या  दिसतात . त्यामुळे मला  महत्वाचे  पद मिळू नये यासाठी काहीजण  प्रयत्न करत असावेत असे मला वाटते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com