जिल्ह्यातून थेंबभरही बीडला नेणार नाही ः पंकजा मुंडे

..
Pankaja_Munde
Pankaja_Munde

नेवासे (नगर),  : "मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खोडसाळ प्रचार आहे. नगर जिल्ह्यातून पाण्याचा एक थेंबही बीडला नेणार नाही,'' अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिली.


भाजप महायुतीच्या पाथर्डी, राहुरी व नेवासे मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारसभेत पांढरी पूल येथे मुंडे बोलत होत्या. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजप उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठल अभंग, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.


मुंडे म्हणाल्या, "सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय युती शासनाने घेतला आहे. धनगर समाजालाही आदिवासींच्या सवलती लागू केल्या आहेत. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून धनगर समाजाची दिशाभूल करण्याचे कारस्थान रचले जात आहे. नगर जिल्ह्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. भविष्यात आर्थिक विकास साधून बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचा हे भाजपचे स्वप्न आहे. 370 हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही, तर आपल्या संस्कार व स्वाभिमानाचा मुद्दा आहे. राष्ट्राच्या अभिमानासाठी भाजपचा जन्म झाल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहा.''

वाघाचा बछडा, शेळ्यांच्या कळपात होता
कम्युनिस्ट पक्ष, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. 'राष्ट्रवादी'ने ऐन वेळी लंघे यांना उमेदवारी नाकारून 'क्रांतिकारी'चे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिल्याने नाराज झालेल्या लंघेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'वाघाचा बछडा, शेळ्यांच्या कळपात गेल्याप्रमाणे माझी अवस्था होऊन, "राष्ट्रवादी'तील काळ अत्यंत खडतर गेला,' अशी प्रतिक्रिया लंघे यांनी भाषणात व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com