खडसेंच्या अस्तित्वाचा प्रश्न, ते बोलणारच: पंकजा मुंडे

पार्टी हायकमांडशी माझा नेहमी संपर्क आहे. मात्र गेल्या दहा दिवसांत झालेल्या घटनाक्रमाबाबत मी त्यांच्याशी बोललेले नाही.- पंकजा मुंडे
 Pankaja Munde says Eknath Kahdse is fighting a battle for survival 
Pankaja Munde says Eknath Kahdse is fighting a battle for survival 

पुणे: एकनाथ खडसे हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे बोलणे, त्यांची अगतिकता मी पाहते आहे. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ते बोलणारच, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. 

पंकजा मुंडे 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाल्या, त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या मुलीचा निवडणुकीत पराभव झाला. ते मंत्रीमंडळात होते. त्यांना मंत्रीमंडळाबाहेर पडावे लागले. सभागृहातही आमदार म्हणून बोलताना त्यांची अगतिकता दिसत होती. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे पक्षाने द्यायला हवीत. 

खडसे, तावडे, बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, घेतलेला निर्णय चुकला आहे, हे स्विकारले पाहिजे. नेतृत्वाने आपल्या चुका मान्य केल्या पाहिजेत. अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. 

त्या पुढे म्हणाल्या, बावनकुळे यांचे तिकीट कापले त्याचा फटका पक्षाला विदर्भात बसला. याचे आत्मपरिक्षण झाले पाहिजे. हायकमांडने जरी निर्णय घेतला असेल तरी केंद्रिय नेतृत्वाला फिड करणे हे आमचे कामच आहे. जे तिकीट वाटपात ठरले, त्यावेळी राज्यातील आम्ही सर्वजण होते. आमचे असेसमेंट चुकले, हे आम्ही मान्य केले पाहिजे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com