काय सांगता? : पंकजा मुंडे, उदयनराजे राज्यमंत्री अतुल सावे, पंकज भुजबळ पिछाडीवर

काय सांगता? : पंकजा मुंडे, उदयनराजे राज्यमंत्री अतुल सावे, पंकज भुजबळ पिछाडीवर

पुणे : राज्यात शिवसेना आणि भाजप युतीने आपली घोडदौड कायम ठेवत प्राथमिक कलांमध्ये 165 जागांवर आघाडी ठेवली आहे. दुसरीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला 64 जागांवर कौल मिळण्याची शक्यता आहे. भोसरीतून महेश लांडगे हे तब्बल 15 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पुरंदर हवेलीतून शिवसेनेचे  विजय शिवतारे 1127 मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीअखेर खडकवासलामध्ये राष्ट्रवादीचे सचिन दोडके तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे या 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे परळीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत.

औरंगाबाद पूर्व : भाजपाचे राज्यमंत्री अतुल सावे ७,९३३ मतांनी पिछाडीवर

कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार रोहित पवार हे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे हे परळीतून आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत 5377 मतांनी सुमनताई पाटील यांना आघाडीवर आहेत. जळगाव शहर : पोस्टल मतमोजणीत भाजपचे सुरेश भोळे 1178, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील 673 अपक्ष उमेदवार काॅग्रेस चे माजी मंत्री प्रकाश आवाडे आघाडीवर,  भाजप आमदार सुरेश हाळवणकर अडचणीत

पारनेरला राष्ट्रवादीचे निलेश लंके पहिल्या फेरीत 514 मतांनी पुढे आहेत. बाळापूर मधून नितीन देशमुख 4000 मतांनी आघाडीवर आहेत.

येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ २४०० मतांनी आघाडीवर. मात्र नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे ५११६ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे  पंकज छगन भुजबळ ३१२३ मते. यामध्ये पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com