pankaja munde not unhappy on bjp vinod tawade | Sarkarnama

पंकजा मुंडे भाजपवर नाराज नाहीत : विनोद तावडे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या व्यथित आहेत. बाकी त्यांची भाजपवर कोणतीही नाराजी नाही अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज माध्यमांना दिली. 

पंकजाताईंच्या नाराजीने भाजपला जोरदार धक्का बसला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी पंकजाताईंची पाठराखण करीत त्या नाराज नाहीत आणि त्या भाजप कदापी सोडणार नाहीत असे म्हटले होते. आज त्यांची बबनराव लोणीकरांनी भेट घेतली होती.

त्यापाठोपाठ विनोद तावडे आणि राम शिंदेही भेटले. या भेटीविषयी बोलताना तावडे म्हणाले, की पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र विरोधकांनी या त्यांच्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला आहे. यामुळे त्या व्यथित आहेत. बाकी त्यांची पक्षावर कोणतीही नाराजी नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख