पंकजा मुंडे पक्षांतर करणार हा विषयच संपला, मी ही गोपीनाथ गडावर जाणार आहे : गिरीश महाजन
जळगाव : "" माझ्या रक्तात बंडखोरी नाही, असे पंकजा मुंडेनी जाहिरच केले आहे. मी ही त्यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे त्यांचा पक्षातंराचा कोणताही विषय नाही, त्याबाबतचा विषयच आता संपला आहे. मी सुध्दा बारा डिसेंबरला गोपिनाथ गडावर जाणार असल्याची माहिती माजी जलसंपदामंत्री व भाजपचे "संकटमोचक'गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'ला दिली.

माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षात अस्वस्थ असून त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. याबाबत महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की पंकजा मुंडे यांच्याशी आपण संपर्क केला आहे, त्यांनी पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आता विरोधी पक्षाच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, की गेली पाच वर्षे सोडली तर आम्ही विरोधी पक्षातच होतो. त्यामुळे आताही आम्ही विरोधी पक्षाचे काम करणार आहोत. तीन पक्षाचे सरकार कसे चालते ?यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत.
15 हजार कोटींना मंजूरी द्यांवी
राज्यातील तसेच खानदेशातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटीच कर्ज घेण्याचा ठराव केला आहे.त्याच निधीच्या आधारावर खानदेशातील मेगा रिचार्च, गिरणावरील बलून बंधारे.निम्म तापी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. नवीन सरकारने आता या निधीला मंजूरी द्यावी.अन्यथा मार्गी असलेले हे सिचंनाचे प्रकल्पही बंद पडून सिचंनाची मोठी तुट निर्माण होईल. नवीन सरकारच्या माध्यमातून हे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आपण विरोधी पक्ष म्हणून पाठपुरावा करणार आहोत.