पंकजा मुंडे माझ्या भगिनी, संकटाच्यावेळी मी त्यांच्यासोबत : राजू शेट्टी 

भगवानगडावर झालेल्या मेळाव्यात मी पंकजा मुंडे यांना 'आयुष्यभर भाऊ म्हणून साथ देण्याचा शब्द दिला होता. आम्ही आजही त्यांच्या सोबत आहोत.
raju shetty pankaja munde
raju shetty pankaja munde

पुणे: "पंकजा मुंडे या माझ्या भगिनी आहेत. त्यांच्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा मी त्यांच्या सोबत असेन, असा शब्द मी भगवानगडावर झालेल्या मेळाव्यात बोलताना दिला होता. त्या शब्दाला मी आयुष्यभर बांधील आहे,"अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कालच्या गोपीनाथगड येथील मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणानंतर उठलेल्या राजकीयवादळाबाबत त्यानी प्रतिक्रिया दिली.

"मी भाजपच्या स्टेजवर जायचे नाही असे ठरवले आहे. कालचा मेळावा भाजपचा असेल म्हणून मी गेलो नाही. हा मेळावा भाजपचा नाही हे मला माहिती नव्हते नाहीतर मी नक्की गेलो असतो,"असे शेट्टी म्हणाले.

"भगवानगडावर झालेल्या मेळाव्यात मी पंकजा मुंडे यांना 'आयुष्यभर भाऊ म्हणून साथ देण्याचा शब्द दिला होता. आम्ही आजही त्यांच्या सोबत आहोत. कोणतेही संकट आले तरी मी त्यांच्या मदतीला जाईन. त्या मुंडे साहेबांच्या कन्या आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे."असे शेट्टी म्हणाले.

"राजकारण वेगळं आणि स्नेह वेगळा. मला माहीत असत की कालचा मेळावा भाजपचा नाही तर मी गेलो असतो. मी गेलो नसलो तरी ताईंना माझा पाठिंबा आहे,"अस शेट्टी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com