राजळेंची विनंती मान्य होवो अथवा न होवो, पंकजा मंत्री होणार!

राजळेंची विनंती मान्य होवो अथवा न होवो, पंकजा मंत्री होणार!

राज्यात 2014 मध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनात पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेने महत्वाची भुमिका निभावली होती. त्या दरवर्षी दसरा मेळावा घेवून आपली ताकद दाखवून देत असतात. राज्यातील 40 हून अधिक मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे.

पुणे: राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघात पराभूत झाल्या असल्यातरी संभाव्य मंत्रीमंडळात त्यांची मंत्री म्हणून वर्णी पक्की मानली जात आहे. 
विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतदार काही प्रमाणात दुरावल्याने भाजपला नुकसान झाले आहे. यापार्श्वभुमीवर ओबीसी व्होटबॅक कायम ठेवण्यासाठी भाजप पंकजा यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास तयार नाही. 

विधानसभा निकालानंतर राज्यात नवी समीकरणे मांडली जात असलीतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, अशीच स्थिती आहे. त्यामुळे फडणवीसांच्या संभाव्य मंत्रीमंडळात कोण कोण असेल, याचीही चर्चा सुरू झाली आहे. या नावात परळीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.

गेली दहा वर्षे पंकजा मुंडे परळीत संघर्ष करत आहेत. मंत्री झाल्यापासून तर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. गेल्या पाच वर्षात पालिका, झेडपी, पंचायत समिती, बाजार समित्यांच्या निवडणुकांत त्यांना पराभव पत्करावा लागला. आता विधानसभेला त्यांना मोठी हार पत्करावी लागली आहे. आता पंकजा यांची पुढील राजकीय वाटचाल कशी राहील, याची उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात ओबीसी मतदार भाजपपासून दुरावला आहे. तो काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित आघाडीकडे विभागून गेला आहे. आता पंकजा सत्तेबाहेर राहिल्या तर ओबीसी मोठ्या प्रमाणात भाजपपासून दुरावू शकतात, विशेषत: मुंडेभक्त भाजपविरोधात टोकाचे आक्रमक होवू शकतात. त्यामुळे पंकजा यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाजपला परवडणारे नाही. परिणामी पंकजा यांच्यापुढे विधान परिषदेवर जावून मंत्री होण्याचा पर्याय भाजपकडून दिला जावू शकतो.  

पंकजा यांना विधानसभेत निवडून जाता यावे म्हणून नगर जिल्ह्यातील शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी ठेवली आहे. तशी विनंती त्यांनी पंकजा यांना केली आहे. यासंदर्भात भाजप काय निर्णय घेणार, हे आता पहावे लागणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com