Pankaja Munde meets a conjurer | Sarkarnama

पंकजा मुंडे यांच्या भेटीला जादूगार पोलीस !

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुंबई :  गेल्या आठवड्यात ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांच्या  रॉयलस्टोन  बंगल्यावर जादूगार पोलिसाने भेट दिली . आपल्या जादूने या जादूगाराने पंकजा  मुंडे व खा. डॉ. प्रीतम   मुंडे थक्क करून सोडले . 

मुंबई :  गेल्या आठवड्यात ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांच्या  रॉयलस्टोन  बंगल्यावर जादूगार पोलिसाने भेट दिली . आपल्या जादूने या जादूगाराने पंकजा  मुंडे व खा. डॉ. प्रीतम   मुंडे थक्क करून सोडले . 

पोलीस निरीक्षक सुभाष दगडखैर असे या जादूगाराचे नाव आहे . त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेले आहे .  २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत कसाब आणि त्याच्या बरोबर आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत दहशतवादी हल्ला  केला होता . त्यावेळी नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कमांडोसोबत  अतिरेक्यांशी ते लढलेले आहेत .

पोलिस दलात ते कर्तबगार अधिकारी आणि नावाजलेले जादूगार म्हणून प्रसिद्ध आहेत . मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले सुभाष दगडखैर आता जादूगारांच्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात नाव कमावून आहेत ,

ते जादूगारांचे ऑस्कर म्हणजे मर्लिन अवार्ड विजेते आहेत . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासह  जगातल्या 7 राष्ट्रपतींना  त्यांनी आपली जादू दाखवलेलली आहे  व 35 देशाचा प्रवास केलेलला आहे .  

या भेटीत मुंडे भगिनींनी सुभाष दगडखैर  यांचा सत्कार केला . अर्धा तास दगडखैरी याने आपल्या जादूच्या प्रयोगांनी उपस्थितांना थक्क करून सोडले . 

मात्र या भेटीत सुभाष दगडखैर यांनी पंकजाताईना राजकीय पदोन्नती कशी मिळवायची याची जादू शिकवली की पंकजाताईनी बीड जिल्हा परिषदेत  बहुमत नसताना  भाजपकडे अध्यक्षपद खेचून आणण्यासाठी जादूची कांडी  कशी फिरवायची हे सुभाष दगडखैर याना शिकवले याविषयी चर्चा  रंगली आहे . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख