...तर पंकजा मुंडे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदी संधी

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जाणार का, यावर पंकजा मुंडे यांना भविष्यात संधी मिळण्याचे उत्तर अपेक्षित आहे.
pankaja munde
pankaja munde

मुंबई ः भारतीय जनता पक्षाच्या आगामी प्रदेशाध्यक्षाची निवड येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात करण्यात येणार असून, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावणे येणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रात बोलावणे आले तर त्यांच्या जागी म्हणजे विधान सभेचे विरोधी पक्षनेते म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागेल, तर प्रदेशाध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे अथवा पंकजा मुंडे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल.

भाजपच्या जिल्हा तथा शहर पातळीवरील संघटनात्मक बदल पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच मुंबई प्रदेशाध्यक्षाचीही निवड करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथे सुमारे ११ हजार प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्य परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले आहे. भाजपचा संघटनात्मक पातळीवर निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे. यात जिल्हाध्यक्ष, मंडळाध्यक्ष, बूथ अध्यक्ष यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पाडला आहे. यानंतर सर्वांत शेवटी प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष यांची निवड केली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com