वॉटर ग्रीडच्या माध्यमातून सिंचनालाही पाणी हवंय : पंकजा मुंडे

,.
Pankaja_Munde
Pankaja_Munde

औरंगाबाद : वॉटर ग्रीडच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला केवळ पिण्याचं पाणी देऊन चालणार नाही तर सिंचनालाही पाणी देऊन शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढावं, अशी भूमिका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.

'' काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा प्लॅन सांगितला आहे; त्यांनीही सकारात्मक विचार करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ बैठक लावण्याचे आदेश दिले आहेत'', अशी माहिती पंकजा मुंडे यांनी आज औरंगाबादेत दिली.

त्या म्हणाल्या, ''संपूर्ण दुष्काळमुक्तीसाठी ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मी करीत आहे. मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हाही मांडत होते. सत्तेत आल्यानंतर जलयुक्त शिवार, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जलसंधारणसारखे अनेक विषय आम्ही यशस्वीरित्या हाताळले. कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यातील काही भागात आणण्यासाठी निर्णय घेतले.''

त्या पुढे म्हणाल्या, ''मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काही योजना तात्काळ करणं गरजेचे आहे. त्या उपाय योजनांच्या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ बैठक लावण्याचे आदेश दिले आहेत. हा संपूर्ण प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर सहा हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. त्यासाठी तीन ते चार वर्षाचा किमान कालावधी आहे.''

''जायकवाडीमध्ये सध्या पाणी आहे. जायकवाडीचे पाणी माजलगावपर्यंत येईल. मात्र मांजरा प्रकल्पाच्या भागात किंवा उर्वरित मराठवाड्यात पाऊस पडला नाही तर पुन्हा मराठवाडा दुष्काळग्रस्त राहतो. आपण सध्याचे वॉटर ग्रिट करतोय, त्यातून या धरणातून त्या धरणामध्ये पिण्यासाठी पाणी देण्याचं नियोजन सुरू आहे. आता नुसतं पिण्याचे पाणी नाही तर त्याचा उपयोग सिंचनासाठी झाला पाहिजे, याचा विचार केला गेला पाहिजे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कुठपर्यंत विमा आणि पिण्याच्या पाण्यावर भागवायचं'' असंही त्यांनी सांगितले.

आज औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि खानदेश-मराठवाड्यातील भाजप मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com