Pankaja Munde launches full fledged attack on Dhanajay Munde | Sarkarnama

धनंजय मुंडेंचा विषय निघताच पंकजा मुंडे कडाडल्या, आम्ही तोडपाण्याचं काम करीत नाही.. 

दत्ता देशमुख 
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

शिर्डी येथे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ग्रामविकास विभागाच्या घरकुल वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या खर्चाबाबत ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयावर धनंजय मुंडे यांनी टीका केली होती. हा मुद्दा भाषणात येताच पंकजा मुंडे अत्यंत आक्रमक झाल्या . धनंजय मुंडे यांचे त्यांनी नाव घेतले नाही तरी त्या धनंजय मुंडे यांनाच उद्देशून बोलत असल्याचे श्रोत्यांच्या प्रतिसादातून दिसून आले . 

बीड : " आम्ही उत्सव, करमणुकीचे कार्यक्रम करत नाही. आम्ही तोडपाण्याचं काम करीत नाही . गरिबांच्या डोक्यावर छत देतोय तर तुमच्या पोटात का दुखते?  तुम्ही एखादा हौद तरी बांधला का?  तोडपाणी करणाऱयांनी बोलू नये " , असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी घरकुलांचे ई लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमासाठी लोक जमा करण्यासाठी बस आणि इतर खर्च करण्याबाबच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयावर धनंजय मुंडे यांनी टीका केली होती. गुरुवारी सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले. गणेशोत्वात धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठनने आयोजित महोत्सवातील कार्यक्रमावरूनही त्यांनी टीका केली.

" आम्ही उत्सवात  करमणुकीचे कार्यक्रम करत नाही. लोकांच्या डोक्यावर छत देतोय. विरोधात असताना आम्ही सामान्यांचे अश्रू पुसले. सत्तेत असताना दुष्काळ पडला तर बांधावर जातोय."  आज, टिकेला प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे यांनी धस यांच्याकडे पाहून 'सुरेश धस त्यांना तोडपाणी करणारे नेते' म्हणतात असे म्हणत टोला लगावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख