केजच्या नवीन गणिताचे कॅलक्युलेटर माझ्याकडे आहे : पंकजा मुंडे  

मुंबई किंवा दिल्लीत प्रवेश घेऊ असे मी अक्षय मुंदडाला म्हणाले होते. परंतु, गोपीनाथगडावरच प्रवेश करायचा असा अक्षयचा आग्रह होता. केज हा माझा व दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचा गड असल्याने नमिता मुंदडांचा विजय कोणीही रोखू शकत नाही असेही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
munde-mundada
munde-mundada

केज : नमिता मुंदडांना मी उमेदवारी दिली आहे. मतदान करताना कमळाचे चिन्ह बघा त्यात मी आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे दिसतील. त्यावरच मतदान करा, मी समजून नमिता मुंदडांना विजयी करा असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. केज हा माझा आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा गड असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील अंमळेचा बरड येथे सभा घेतली. 

आपल्याला बेरजेचे राजकारण वडिलांनी शिकविले आहे. राजकारणात कोणीच कायमचा शत्रु नसतो. म्हणून आपण जादूची कांडी फिरविली आणि नमिता मुंदडाला उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

नमिता मुंदडांची उमेदवारी जाहीर करताना आपण मतदार संघातील पक्षातील सर्व प्रमुखांना विश्वासात घेतले. कालानुरुप निर्णय घ्यावे लागातात. राष्ट्रवादी त्यांना उमेदवारी देऊन पाडणार होते. मुंदडांचे ५० हजार आणि आपले भाजपचे मतदान एकत्र होऊन त्यांचा विक्रमी मतांनी विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

केजमध्ये नमिता नाही तर पंकजा मुंडे उभा आहे असे समजून मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नवीन गणिताचे कॅलक्युलेटर आपल्याकडे असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण दोन उमेदवार बदलले परंतु कुठलाच रुसवा झाला नाही. कारण मी आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर प्रेम केले. म्हणून हा बदल स्विकारुन नमिता मुंदडांना विजयी करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रम मुंडे, राजेंद्र मस्के, सभापती संतोष हंगे, अक्षय मुंदडा, सभापती संदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, योगीनी थोरात, भारत काळे, रमाकांत मुंडे, हारुण इनामदार, सुरेंद्र तपसे, दत्ता धस आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com