पंकजा मुंडेंची प्रकृती उत्तम, डॉक्टरांनीं घरी पाठवले 

पंकजा मुंडे यांनी इतर चार मतदार संघात सभा घेऊन शेवटची सभा स्वत:साठी परळीत घेतली. या दगदगीमुळे भोवळ आली असावी असा अंदाज आहे.
pankaja_munde
pankaja_munde

परळी वैजनाथ : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या शेवटच्या सभेतील भाषण संपल्यानंतर काही वेळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना व्यासपीठावर भोवळ आल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात सभेनंतर कार्यकर्ते त्यांच्यासोबत सेल्फी घेत असताना ही घटना घडली. त्यांना तातडीने व्यासपीठावरुन उपचारासाठी हलवण्यात आले.

वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी पंकजा मुंडे यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगून त्यांना घरी  जाण्याची परवानगी दिली . 
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे परळी मतदार संघातून भाजप महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराची शेवटची सभा राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात होती. सभेत त्यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांना भोवळ आली.

त्यांना तातडीने खाजगी दवाखान्यात उपचार करून यशश्री बंगल्यावर नेले. दरम्यान शनिवारी पंकजा मुंडे इतर चार मतदार संघात सभा घेऊन शेवटची पाचवी सभा स्वत:च्या मतदार संघात घेतली. या दगदगीमुळे त्यांना चक्कर आली असावी असा अंदाज आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com