ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना बिर्लांच्या हस्ते अचिव्हर्स पुरस्कार प्रदान  - Pankaja Munde felicitated by the hands of Kumarmanagalam Birla | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना बिर्लांच्या हस्ते अचिव्हर्स पुरस्कार प्रदान 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय क्षेत्रातील यशाबद्दल पुरस्कार देऊन गौरवीत करण्यात आले आहे . 

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय क्षेत्रातील यशाबद्दल पुरस्कार देऊन गौरवीत करण्यात आले आहे . 

त्यांना राजकीय क्षेत्राचा  सोसायटी अचिव्हर्स पुरस्कार  2018 मिळाला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन श्री कुमारमंगलम बिर्ला ह्यांच्या हस्ते  अत्यंत दिमाखदार सोहळ्यात रविवारी पंकजा मुंडे यांना हा पुरस्कार  मुंबईमध्ये प्रदान करण्यात आला.

 जीवनशैली व सेलिब्रिटी यांच्या संबंधित  सोसायटी मॅगझीनच्या वतीने कला, साहित्य, राजकारण, उद्योग, संगीत आदी  क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार येस बँकेच्या श्रीमती. कपूर यांना पंकजा मुंडे यांच्या  हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी खा.पूनम महाजन, चित्रपट कलावंत जितेंद्र, झीनत अमान, रेखा, हेमा मालिनी, रविना टंडन, अनु मलिक, रोहित शेट्टी, सोनू सूद, शान, तुषार कपूर, अमन-अयान, आदित्य चोप्रा,  इत्यादी बॉलिवूड, उद्योग, राजकीय क्षेत्रातील ख्यातनाम मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख