एमपीएसीकडून ‘एनटी - ड’ उमेदवारांवर अन्याय; सुधारीत जाहीरात काढा : पंकजा मुंडे - Pankaja Munde Demands Fresh Advertisement of MPSC | Politics Marathi News - Sarkarnama

एमपीएसीकडून ‘एनटी - ड’ उमेदवारांवर अन्याय; सुधारीत जाहीरात काढा : पंकजा मुंडे

दत्ता देशमुख
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी दुय्यम सेवा अराजपत्रित 'गट- ब' साठी संयुक्त पूर्व परिक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली. या अंतर्गत पोलीस उप निरीक्षक गट-ब (अराजपत्रित) पदाच्या ६५० जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण ६५० जागांपैकी ४७५ जागा हया विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत

बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत एनटी-ड प्रवर्गाला एकही जागा आरक्षित केली नाही. त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून राज्य शासनाने यात तात्काळ लक्ष घालावे तसेच या प्रवर्गातील उमेदवारांवरील अन्याय दूर करण्यासाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी दुय्यम सेवा अराजपत्रित 'गट- ब' साठी संयुक्त पूर्व परिक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली. या अंतर्गत पोलीस उप निरीक्षक गट-ब (अराजपत्रित) पदाच्या ६५० जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण ६५० जागांपैकी ४७५ जागा हया विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. 

संबंधित लेख