Pankaja Munde campaigns for Jaydatta Kshirsagar | Sarkarnama

विकासासाठी अनुभवी जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करा : पंकजा मुंडे

सरकारनामा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग बीड मतदार संघात आहे. पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांना फायदा होणार आहे . 

बीड : शत्रु पक्षाला चांगले काही दिसतच नाही, राष्ट्रवादी चांगल्या माणसाला संपवण्याचे काम करते हा इतिहास आहे. त्यामुळेच नेते आणि पदाधिकारी स्वत:ला असुरक्षित समजून भाजपा - शिवसेनेमध्ये येत आहेत. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी अनेकांना गुलाल लावला. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

बीड मतदार संघात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडे यांच्या सभेमुळे जयदत्त क्षीरसागर यांना मोठा फायदा होणार आहे . 

महायुतीचे बीड मतदार संघातील उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी रायमोहा येथे सभा घेतली. उमेदवार जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश  पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे उपस्थित होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्यामध्ये सहाही आमदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत, बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. आमच्या पंखाला बळ देताना विजयाची जोड लावा असेही मुंडे म्हणाल्या. 

तर, जयदत्त आण्णा क्षीरसागरांनी राष्ट्रवादीमध्ये मोठा वाईट काळ सोसला. आपल्या अडचणीत आणि प्रितम मुंडे यांना क्षीरसागर बंधूंनी खंबीर साथ दिली. त्यांना आता साथ देण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले. 

धनुष्य बाण हाच रामबाण उपाय आहे.म्हणून धनुष्य बाणाला साथ द्या, असे आवाहन उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ३० वर्षांच्या राजकारणात दुजाभाव, दोन समाजात तेढ होईल असं केलं नाही. विरोधकांची ही बेगडी रूपं असून ती तात्पुरती आहेत. ते रडतील पडतील पण त्यांच्या या रूपाला थारा देऊ नका असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

बाळासाहेब अंबुरे,वैजीनाथ तांदळे,बाळासाहेब जगताप,दशरथ वणवे,मुन्ना फड,सागर बहिर,सुशील पिंगळे, राजेंद्र मस्के, बप्पासाहेब घुगे, संपदाताई गडकरी, संगिताताई चव्हाण, सर्जेराव तांदळे, नितीन धांडे, हनुमान पिंगळे, प्रा जगदीश काळे, डॉ योगेश क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, वसंत सानप, जयश्री सानप, मधुसूदन खेडकर, भारत सोन्नर,

सुनील सुरवसे, गणपत डोईफोडे, अरुण बोगाणे ,परमेश्वर सातपुते,गणेश उगले,यांच्यासह सुधाकर मिसाळ, वैजीनाथ मिसाळ, रामराव खेडकर, सुभाष क्षीरसागर, कलंदर पठाण, संजय सानप, मीना उगलमूगले, महेश धांडे, राणा चौहान, आशिष काळे, सचिन बुंदेले, शुभम कातागळे, राजेंद्र बांगर, खरमाडे उपस्थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख