आजचा वाढदिवस : पंकजा मुंडे, महिला-बालकल्याण व ग्रामविकास मंत्री - Pankaja Munde Birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : पंकजा मुंडे, महिला-बालकल्याण व ग्रामविकास मंत्री

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

आजचा वाढदिवस - जन्म तारीख २६ जुलै १९७९

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जेष्ठ कन्या असलेल्या पंकजा मुंडे या परळी मतदार संघातून दुसऱ्या वेळा आमदार आहेत. मास लिडर म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आहेत.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जेष्ठ कन्या असलेल्या पंकजा मुंडे या परळी मतदार संघातून दुसऱ्या वेळा आमदार आहेत. मास लिडर म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये आहेत. पंकजा मुंडे या राज्य मंत्रीमंडळात ग्रामविकास व महिला- बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर पंकजा यांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढून स्वतंत्र राजकीय कतृत्व सिद्ध केले. बीड जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या भगीनी डॉ. प्रितम मुंडे विक्रमी मतांनी खासदार म्हणून विजयी झाल्या. तर, जिल्ह्यात भाजपचे त्यांच्यासह पाच आमदार आहेत. त्यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून त्यांनी राज्यात विविध योजना राबविल्या आहेत. राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता त्यांनी आपला वाढदिवस साजरा करणार असल्याचे आपल्या फेसबूक पेजवरुन जाहीर केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख