pankaja munde avoids bjp`s name in twitter | Sarkarnama

पंकजा मुंडे यांनी भाजपशी असाही `संबंध` तोडला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 डिसेंबर 2019

बीड : परळीतून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रथमच ता. 12 डिसेंबरला दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक कार्यक्रमात येत आहेत. 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू असे आवाहन करत येणार ना मग तुम्ही सर्व ? मावळे येतील हे नक्की असा विश्वासही आपल्या फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी व्यक्त केला आहे. 

ही घोषणा केल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून भाजपशी संबंध तोडल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरून भाजपशी काहीच नाते नसल्याचे दाखविले आहे. आपल्याविषयीची माहिती देताना फक्त आपले नाव आणि गोपीनाथ गडावरील सभेचा फोटो ठेवला आहे. य़ा आधी त्या हॅंडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करतानाचा पंकजा यांचा फोटो कव्हर फोटो म्हणून होता.

पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदार संघातून 30 हजारांवर मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला आणि त्याची जबाबदारीही स्वत:वर घेतली. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्याप त्या जिल्ह्यात आणि सार्वजनिक कार्यक्रमात आल्या नव्हत्या. मात्र, आता त्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त येत आहेत. समर्थकांना आवाहन करणारी आणि उपस्थितीबद्दल विश्वास व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुकवरुन लिहली आहे. भविष्यातील वाटचालीचा निर्णयही यावेळी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पंकजा मुंडे यांच्यासमोर काय पर्याय असू शकतात

1)त्या शिवसेनेत जाऊ शकतात. त्यांना भाजपच्या काही आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांना त्या भाजपमधून आणू शकतात.

2)भाजपमध्येच राहून विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात आणि तेथे विरोधी पक्षनेत्या बनू शकतात.

3)भाजपच्या प्रदेशाध्यक्ष त्या बनू शकतात. 

त्यामुळे त्यांची बारा डिसेंबरची खेळी मोठा राजकीय दबाव टाकण्याची सुरवात असू शकते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख