नागरिकांच्या पाणी - रस्ता प्रश्नांसाठी पंकजा मुंडे यांच्या कामाच्या ठिकाणाला थेट भेट

नागरिकांच्या पाणी - रस्ता प्रश्नांसाठी पंकजा मुंडे यांच्या कामाच्या ठिकाणाला थेट भेट

बीड : पालकमंत्री असल्याने कुठूनही आणि काहीही सुचना दिल्या तरी प्रशासन नक्की अंमलबजावणी करेल. मात्र, लोकप्रतिनिधी असल्याने थेट जनतेत जाऊन समस्या ऐकून त्यांचे समाधान करणे वेगळेच असते. पाणी आणि रस्ता या परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर पंकजा मुंडे थेट रस्त्यावर उतरल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने सुचना दिल्या. 

परळी ते पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची त्यांनी शुक्रवारी पाहणी केली. कंत्राटदाराच्या बेपर्वाईमुळे रस्त्याच्या कामात दिरंगाई झाल्याने जनतेला जो त्रास होत असल्याबद्दल खंत व्यक्त करुन हिन्याभरात कन्हेरवाडी पर्यंतचा रस्ता पुर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी नागरिकांना दिला. मध्यंतरी त्यांनी कंत्राटदाराला तंबीही दिली होती. कामाच्या दिरंगाई मुळे कंत्राटदारावर कारवाई होऊन पुन्हा नव्याने कामाच्या निविदा काढण्यात आल्या. शुक्रवारी परळीत नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून अचानक त्या या कामावर पोचल्या. त्यामुळे अधिकारीही भांबावून गेले. 

त्यांनी परळीकरांच्या पाण्याचा प्रश्न शनिवारी अजेंड्यावर घेतला. तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरातील नागरिकांना पाणी देतांना नगरपरिषदेकडून भेदभाव होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः प्रभागात नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन स्वत: पाणीही वाटप केले. पाणी वाटपात होणारा भेदभाव खपवून घेणार नाही अन्यथा कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदार व मुख्याधिका-यांना दिले. 

पालिकेने टॅंकर लावले असले तरी त्याचे सरकार पैसे देते. पालकमंत्री म्हणून आपण सरकार आहोत असेही त्यांनी यावेळी टॅंकरचालक आणि संबंधीतांना सुनावले आणि नागरिकांनाही दिलासा दिला. वरील दोन्ही प्रश्न अजेंड्यावर घेताना पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा थाट माट बाजूला ठेवून थेट जनतेत मिसळून समस्या जाणून घेतल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com