मी फक्त परळीची नाही आज राज्याची झाले : पंकजा मुंडे

मी फक्त परळीची नाही आज राज्याची झाले : पंकजा मुंडे

परळी : मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून सर्व महाराष्ट्र भर दौरा काढणार आहे. हातात मशाल घेऊन फिरणार आहे असे सांगत आता शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगीतले. आता आपण फक्त परळीची नाही तर राज्याची झाली असल्याचे सांगत आता कुठलेही बंधन नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंती निमित्त त्यांना गोपीनाथगडावर अभिवादन सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, अतुल सावे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, रमेश आडसकर, रमेश पाकळे आदींसह भाजप नेत्यांची उपस्थिती होती. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, ठाकरेजी तुम्ही मराठवाडा दुष्काळ मुक्त करा. 26 जानेवारीला गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करणार असल्याच सांगून 27 जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. 


फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी फिरत होते 
बारा दिवस टीव्हीवर फक्त माझी चर्चा सुरू आहे, सूत्रांकडून अनेक बातम्या येत होत्या ,मी बंड करणार. मग जेव्हा फडणवीस, अजित पवारांनी शपथ घेतली ते कसं सुत्रांना कळलं नाही असा टोला पंकजा यांनी प्रसारमाध्यमाना लगावला. राज्यात पुन्हा भाजपच सरकार यावं म्हणून मी फिरत होते, एक एक आमदार निवडून यावा म्हणून प्रयत्न करत होते. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे पक्षाने आधीच जाहीर केले होते, मग मी बंड कशी करणार असा सवाल देखील पंकजा यांनी उपस्थित केला. 

माझी अपेक्षा माझ्या बापाकडून होती. माझ्यासाठी पाहिले राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग मी आहे. मी कशी पडले यावर सविस्तर पुस्तक लिहीन, पण पराभवानंतर मी पक्ष सोडावा असे कोणाला वाटते? मी पक्षावर दबाव आणला अशा बातम्या आल्या, त्यावर मला काही मिळू नये म्हणून कुणी हे करतंय का ? असा सवालही पंकजा यांनी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com