pankaja munde and cm | Sarkarnama

मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलाही दावा केलेला नाही - पंकजा मुंडे

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मी, मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या कार्यकर्त्यांना आपण ओळखत नाही. शिवाय, आपण तसा दावाही केला नाही, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. आपली ही तिसरी टर्म असल्याने भाजपच्या प्रथा परंपरा आपल्याला अवगत असल्याने असे करून काही होत नसते, अशी प्रतिक्रीया त्यांनी गुरुवारी (ता.दहा) येथे व्यक्‍त केली. 

भाजपाचे नवे धोरण माध्यमासमोर ठेवण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री मुंडे यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांची यादीच समोर ठेवली. त्यानंतर पत्रकारांनी आपण मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी होत आहे ? त्यावर त्या म्हणाल्या, भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पक्षनेतृत्वासमोर काही कार्यकर्त्यांनी तशा भावना व्यक्‍त केल्या. मात्र, आपण त्या कार्यकर्त्यांना ओळखत नाहीत. यापूर्वी आपण मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलल्याचा आरोप केला गेला. खरं तर मंत्री विनोद तावडे यांनी तसे काहीतरी वक्‍तव्य केले होते. मात्र, आपण ते वक्‍तव्य कधीच स्वीकारले नाही, असेही त्यांनी नमुद केले. 

मुख्यमंत्री पदाबद्दल बोलल्यामुळेच राज्यातील प्रभावी ओबीसी नेते असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या. आता राज्यातील महत्वाचा ओबीसी चेहरा म्हणून तुम्ही पुढे येत आहात, त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, असा प्रश्‍न विचारला असता. ते आपल्याला काही माहित नाही, असे उत्तर त्यांनी दिले. 

परळीमध्ये बहिणीचीच हवा, तरी चांगली फाईट होईल 
परळीमध्ये काय सुरु आहे, असा प्रश्‍न मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला असता. परळीत बहिणीचीच हवा आहे, असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर निवडणूक एकतर्फी होईल ? असा प्रश्‍न उपस्थित केला असता, चांगली फाईट होईल, असे बोलून दाखविले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख