pankaja munde and bjp government | Sarkarnama

महिलांच्या सक्षणीकरणासाठी भाजपला विजयी करा - मुंडे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅससारख्या अनेक योजना आणून महिलांना सक्षम बनविले, कारण त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती होते. मोदीजींची आई धुराच्या चुलीवर स्वयंपाक करीत होती, तर वडील स्टेशनवर चहा विकत होते. त्यामुळेच मोदीजींनी महिलाची चुलीपासून म्हणजेच धुरापासून सुटका करून घरोघरी गॅस आणला. लहान व्यावसायिकांना चालना दिली. महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या या मोहिमेत महिलांनी महापालिका भाजपच्या ताब्यात देवून सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 

महापालिका निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान आज मुंडे यांच्या ठिकठिकाणी रॅली निघून नंतर सभा झाल्या. महिला मेळाव्यात बोलताना त्यांनी नगरमधील अनेक प्रश्नांचे उदाहरण देवून महिला सक्षमीकरणाचा नारा दिला. खासदार दिलीप गांधी व महिला उमेदवार या वेळी उपस्थित होत्या. मुंडे म्हणाल्या, देशात आणि राज्यात महिला सक्षमीकरणाचे सरकार आलेले आहे. सरकार खूप काही करू इच्छिते, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. महापालिकेवर भाजपचा झेंडा तर लागणारच आहे. यात शंका नाही, परंतु महिलांनी नगरच्या बदलाच्या घटनांचे साक्षीदार व्हावे. वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, या भाबड्या कल्पना सोडून द्या. मुलींच्या जन्माचे स्वागत करा. बचत गटाच्या माध्यमातून पुढे या. अशा बचत गटांना शुन्य टक्के व्याजावर पैसे सरकार देत आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही सर्व महिलांनी या मोहीमेत सहभागी व्हावे. 

त्या म्हणाल्या, महापालिकेचे उमेदवार देताना भाजपने तब्बल 35 महिलांना संधी दिली आहे. ही सोपी गोष्ट नाही. महिला स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. त्या सर्वांच्या कल्याणासाठी, प्रत्येकाच्या कुटुंबाच्या कल्यानासाठी सरकारकडे मागणी करतात. त्यामुळे महिलांना निवडून देवून पहा. नगर शहराचा कसा कायापालट करते. लाखो महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मी रोजगार देवू शकले. यापुढे महिलाराज आणून नगर शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. खासदार गांधी यांनी विरोधकांवर टीका करीत नगरच्या महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असे सांगितले. 

मी बोलते म्हणजे मुंडे साहेबच बोलले
महिला मेळाव्यात भाषण सुरू असताना खालून एका कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली. त्यामध्ये एका ठिकाणी पोस्टरवर स्व. गोपिनाथ मुंडे यांचा फोटो प्रसिद्ध केला नसल्याचे त्याने निदर्शनास आणून दिला. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, फोटो न छापण्यात विशेष नाही. मी तुमच्या समोर बोलते ना. मी बोलते म्हणजेच मुंडे साहेब बोलतात, असे समजा. असे सांगून हा वादग्रस्त मुद्दा यांनी दुर्लक्षित केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख