पंकजा मुंडे भाजप सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत - हरिभाऊ बागडे

पंकजा मुंडे भाजप सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत - हरिभाऊ बागडे

औरंगाबाद : पंकजा मुंडे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा प्रसारमाध्यमातून आणि सोशल मिडियावर सुरू झाल्या आहेत, पण त्यात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही, पंकजा या भाजप सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत असा मला विश्‍वास असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी "सरकारनामा' शी बोलतांना व्यक्त केला. 

परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना राज्यभरात उधाण आले होते. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडेच्या जयंती निमित्ताने गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात त्या मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असेही बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, पंकजा मुंडे पक्ष सोडतील असे मला वाटत नाही, निवडणुकीतील पराभवानंतर त्या कार्यकर्त्यांशी बोलल्या नव्हत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर त्यांच्याकडून नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठीच पंकजा यांनी कार्यकर्त्यांना बोलावले असणार. त्या पक्षावर नाराज आहेत या सगळ्या वावड्या आहेत. 

पैसे वळवल्याच्या आरोपामध्ये तथ्य नाही... 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अल्पकाळात चाळीस हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राला परत पाठवला हा भाजप खासदार हेगडे यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. मुळात केंद्राकडून एखादा प्रकल्प राज्यात राबवायचा असेल तर त्यासाठी लागणारी जमीन संपादित करून ती केंद्राला देणे हे राज्य सरकारचे काम असते. त्यामुळे केंद्राकडून थेट पैसा राज्य सरकारकडे येत नसतो असे ते म्हणाले. 

परंतु या आरोपा संदर्भात आपल्याला पुर्ण माहिती नाही, एखाद्याने केलेल्या आरोपावर उत्तर देणे योग्य नाही, त्यामुळे याची माहिती घेऊनच त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरेल असे सांगत बागडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्‍लीनचीट दिली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com