paniselvam | Sarkarnama

पनिरसेल्वमना स्वगृही आणण्याच्या हालचाली

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

चेन्नई : अण्णाद्रमुकच्या नेत्या आणि दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात सरळसरळ दोन गट पडले. जयललितांचे अत्यंत विश्वासू माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते. अम्माच्या वारसदार म्हणून शशिकलांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण, न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्या तुरुंगात आहे. पक्षातील फूट आणि अस्थिरता या पार्श्‍वभूमीवर पक्षाने बंडखोरांशी चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. 

जयललिता राजकीयदृष्ट्या ज्या ज्या वेळी अडचणीत आल्या त्या त्या वेळी पनीरसेल्वम हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. जेंवहा जयललितांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले त्यावेळी त्यांनी सेल्वम यांनाच मुख्यमंत्री केले. त्यांच्या निधनानंतर ते मुख्यमंत्री बनले खरे पण शशिकला त्यांच्यावर नाराज असल्याने त्यांनी त्यांना धडा शिकविण्याची भाषा केली. पक्षाच्या नेत्या म्हणून शशिकला यांचे नाव पुढे आले. सेल्वम यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले आणि शशिकला यांचे विश्वासू सहकारी पलानीस्वामी हे मुख्यमंत्री बनले. सेल्वम यांच्यावर द्रमुकच्या सहकार्याने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे आरोपही करण्यात आले. शेवटी पनीरसेल्वम हे पक्षाबाहेर फेकले गेले तरी विद्यमान सरकार आपला प्रभाव पाडू शकले नाही. 

राज्यात द्रमुकबरोबरच भाजपला सत्तेचे डोहाळे लागले आहेत. पक्षातील फूट खूप फायदेशीर ठरणार नाही हे विद्यमान सरकारच्या लक्षात आल्याने पक्षाने बंडखोरांशी चर्चा करण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री सेल्लूर के. राजू यांनी पत्रकारांना सांगितले, की मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी वरिष्ठ मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती बंडखोर सेल्वम यांच्याबरोबर अन्य बंडखोरांशीही चर्चा करणार आहेत. 

दरम्यान, सरकार आणि पक्ष एकाच कुटुंबाच्या हातात नसावे हे साधे तत्त्व आहे आणि आमची तशीच मागणी असल्याचे माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख