पाणीप्रश्‍नावरील लोकप्रतिनिधीच्या सर्वपक्षीय बैठकीकडे 44 आमदार व आठ खासदारांनी फिरवली पाठ

मराठवाड्यातील दिग्गज आमदारांपैकी लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, मंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील, परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत, रमेश बोरनारे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, अनुपस्थित होते.
 पाणीप्रश्‍नावरील लोकप्रतिनिधीच्या सर्वपक्षीय बैठकीकडे 44 आमदार व आठ खासदारांनी फिरवली पाठ

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी रविवारी (ता. 2) सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मराठवाड्यातील केवळ 11आमदारांनी हजेरी लावली. तर उर्वरित विधानसभा व विधानपरिषदेच्या 44 आमदार व नऊ खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली.यामुळे पाणी प्रश्‍नावर अजूनही लोकप्रतिनिधी उदासिन असल्याचे या बैठकीतून दिसून आले. 

आमदार प्रशांत बंब यांच्यातर्फे मराठवाड्‌यातील पाणी प्रश्‍नासाठी 2011 पासून सातत्याने बैठका घेत आहे. समन्यायी पाणी वाटप, अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहे. मराठवाड्‌यात 150 टीएमसीची पाण्याची तुट भरून निघण्यासाठी आवश्‍यक असलेले कृष्ण मराठवाडा स्थिरीकरण प्रकल्प, वॉटरग्रीड आणि पश्‍चिम वाहिन्यातील समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रकल्पास गती मिळावी यावर चर्चा झाली. याच संदर्भात येत्या 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आमदार प्रशांत बंब यांनी दिली. प्रमुख्याने या बैठकीत भाजपचे मराठवाड्यातील आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, रमेश पवार, रामराव पाटील रातोळीकर,नारायण कुचे हे दहा आणि शिवसेनेचा एकमेव आमदार संजय सिरसाट उपस्थित होते. सर्वपक्षीय बैठकीपैकी आतापर्यंत झालेल्या पाच बैठकींना लोकप्रतिनिधीचा इतकाच आकडा राहिला आहेत. तीच परंपरा यंदाही कायम होती. 
बैठकीत विद्यार्थ्यांचा गोंधळ 
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीच्या बैठकीत विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व आर.आर.पाटील फाऊंडेशन व सम्यक विद्यार्थी संघटनेशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांनी बैठकीत येत मराठवाड्यावर होणाऱ्या सातत्याने अन्याय विरोधात घोषणाबजी केली. एवढे नव्हे तर दुष्काळ, शेतकरी आत्महत्या यासह विविध प्रश्‍नावर आमदारांना जाब विचारला. एवढे नव्हे तर बाकी आमदार का आणले नाही, त्यांची जबाबदारी तुमची नव्हती का ? आतापर्यंतच्या बैठकीतून काय मिळाले यावर आमदारांना विचारणा केली. यामुळे बैठकीत आमदार विरुद्ध विद्यार्थी असा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 
यांनी फिरवली पाठ 
मराठवाड्यातील दिग्गज आमदारांपैकी लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, मंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील, परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत, रमेश बोरनारे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, अनुपस्थित होते. 
अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्नांवर तरतुदीचा आग्रह धरणार 
यातला पाणीप्रश्न गंभीर असून मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा टॅंकरवाडा अशी विशेषणे लागली. प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्नाचा प्रचार केला गेला. महाविकास आघाडी सरकारनं मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली. पण या योजनेला देखील महाविकास आघाडी कात्री लावण्याच्या तयारीत आहे. यापुढे मुंबईत एक बैठक बोलावली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून येत्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्नांवर तरतूद करण्याची सरकारला विनंती केली जाणार असल्याचे या बैठकीला उपस्थित आमदारांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com