पवार म्हणतात, `अतुल बेनके हेच जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार!`

पवार म्हणतात, `अतुल बेनके हेच जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार!`

जुन्नर : राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि कॉंंग्रेसच्या जागा वाटपात जुन्नरचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे राहील आणि अतुल बेनके हेच आमचे उमेदवार असतील, असा विश्वास जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी व्यक्त केला.

जुन्नरचा मतदारसंघ हा काॅंग्रेसला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सत्यशील शेरकर हे येथूल काॅंग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता वाढली आहे. मात्र असे काही घडले नसावे असे पवार यांनी 'सरकारनामा 'शी  बोलताना सांगितले.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी आहे. यामुळे मतदारसंघ काँग्रेसला मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या उमेदवाराचेच काम करून हा मतदारसंघ पुन्हा आघाडीकडे कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची बाजी करेल, अशी पृष्टीही  पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत झालेल्या चर्चेत जुन्नरला अतुल बेनके यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या उमेदवारीचा प्रचार व प्रसार केला आहे. बेनके यांची जोरदार तयारी झाली असून आघाडीत हा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे. जिल्हा परिषद निहाय  गावभेटी तसेच वैयक्तिक गाठीभेटीतुन बेनके यांचा प्रचार सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी देखील बेनके यांनाच उमेदवारी द्यावी असे स्पष्ट केले आहे. यामुळे आज तरी बेनके हेच उमेदवार आहेत,असे पवार यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com