pandurang baroara joins shivsena | Sarkarnama

आषाढीच्या आधी वेगळा पांडुरंग शिवसेनेकडे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 जुलै 2019

मुंबई : ``शिवसेनेचे भगवे दिवस सुरू झाले आहेत. अनेक लाटा आल्या आणि गेल्या पण ठाणे जिल्हा अभेद्य राहिला आहे. या जिल्ह्यातही आता चांगले दिवस सुरू झाल्याने विधानसभेतही भगवा फडकणार,`` असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

मुंबई : ``शिवसेनेचे भगवे दिवस सुरू झाले आहेत. अनेक लाटा आल्या आणि गेल्या पण ठाणे जिल्हा अभेद्य राहिला आहे. या जिल्ह्यातही आता चांगले दिवस सुरू झाल्याने विधानसभेतही भगवा फडकणार,`` असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

शहापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. सुरुवात चांगली झाली असून सर्व पांडुरंगाच्या दर्शनाला चालले आहेत मात्र हा वेगळा पांडुरंग आमच्याकडे आला असल्याचे सांगत हे लोकं कुठलीही प्रलोभन न घेता शिवसेनेत येत असल्याचे उद्धव यांनी सांगितले. 

मुंबईची `लाइफलाईन` असलेला माझा तालुका आहे. माझ्या तीन पिढ्या शरद पवार यांच्या सोबत होत्या. मात्र माझ्या तालुक्‍यात आज ही पाणी, रोजगार ही मोठी समस्याच आहे. शिवाय भिवंडीपर्यंत येऊ घातलेली एमआयडीसी शहापूरपर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून याचसाठी आपण शिवसेनेत आल्याचं पांडुरंग बरोरा यांनी सांगितलं. 

पांडुरंग बरोरा 'शिवबंधनात' अडकले 

शहापुरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बरोरा यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शहापूर तालुक्‍यात पांडुरंग बरोरा यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा चेहरा अशी ओळख होती. पांडुरंग बरोरा हे शहापुरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. 1980 पासून पवार कुटुंबासोबत पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा यांचे घनिष्ठ संबंध होते. पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. महादू बरोरा हे शहापूर मधून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. बरोरा हे शिवसेनेत गेल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख