जातीयवाद गाडायला निघालेलेच कट्टर जातीयवादी असतात!

राष्ट्रधर्माच्या उत्थानासाठी आवश्‍यक असलेली संजीवनी समर्थ रामदास वाङ्‌मयात आहे. तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेच्या धर्तीवर रामदासी शिक्षण संस्था स्थापन होण्याची गरज आहे. - रमण चितळे (समर्थ रामदास वाङ्‌मयाचे अभ्यासक)
pandurang-balkawade
pandurang-balkawade

पुणे : ''समाजात जातीयवाद गाडायला निघालेलेच कट्टर जातीयवादी असतात. जातीच्या नावाखाली त्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. ही दुकाने चालण्यासाठी समाजातील राजकीय मंडळी कुठलाही वाद उकरून काढतात'', असे मत इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.

"गुरुकुल प्रतिष्ठान' आणि "सत्कार्योत्तेजक सभा, धुळे' यांच्या संयुक्त विद्यमाने संत साहित्याचे अभ्यासक प्रा. र. रा. गोसावी यांच्या मध्ययुगीन मराठी श्रीसमर्थचरित्रे या प्रबंधाचे प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.  समर्थ रामदास वाङ्‌मयाचे अभ्यासक रमण चितळे , गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, प्रा. विश्‍वास नकाणेकर आदी उपस्थित होते. 

बलकवडे म्हणाले, "समाजात जातीयवाद गाडायला निघालेलेच कट्टर जातीयवादी असतात. जातीच्या नावाखाली त्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. ही दुकाने चालण्यासाठी समाजातील राजकीय मंडळी कुठलाही वाद उकरून काढतात, त्यामुळे सामाजिक- वैचारिक जीवन गढूळ होते, त्याकडे लक्ष न देता त्याकाळात शिवाजी महाराज, समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांचे तत्कालीन कार्य एकमेकांना कसे पूरक होते आणि समाजाला पुढे नेणारे होते, याकडे पाहिले पाहिजे.'' 

त्या वेळी समाजधर्म संत तुकारामांनी आणि क्षात्रधर्म समर्थ रामदासांनी सांगितला. राष्ट्रधर्म आणि क्षात्रधर्म सांगणारे एकमेव संत म्हणून समर्थांकडे पाहिले पाहिजे, त्यांच्यानंतर हे कार्य गुरुगोविंदसिंगांनी केले. देश, समाज आणि संस्कृतीप्रती भावना असणाऱ्या प्रत्येक युवकाला समर्थांचे वाङ्‌मय प्रेरणा देईल, असेही बलकवडे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com