बीड जिल्ह्यातील पंडित -धस यांचे भांडण पोहोचले विधान परिषदेत 

राष्ट्रवादी काँग्रेसचेअमरसिंह पंडीत आणि भाजपचेसुरेशधस या दोघांनीही परस्परांच्या ताब्यातील सहकारी संस्थातील गैरप्रकारांवर विधान परिषदेतटीकेची झोड उठवली .
pandit-dhas
pandit-dhas

नागपूर:  बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे  अमरसिंह पंडीत आणि भाजपतर्फे नुकतेच निवडून आलेले सुरेश धस यांचे जिल्ह्यातील भांडण थेट  विधान परिषदेत पोहोचल्याने चर्चेला उधाण आले आहे . या दोघातील भांडण इतके वाढले की बुधवारी  सभागृहाचे कामकाज  दिवसभरासाठी स्थगित  करावे लागले . 

दोघांनीही परस्परांच्या ताब्यातील सहकारी संस्थातील गैरप्रकारांवर विधान परिषदेत टीकेची झोड उठवली . विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अमरसिंग पंडीत आणि सुरेश धस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत या महिना अखेरीस संपते आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सुरेश धस यांना भाषणे लातूर - उस्मानाबाद - बीड मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवलेले आहे . नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अमरसिंह यांनी सुरेश धस यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले होते . त्याची आठवण सभागृहात नव्याने दाखल झालेल्या सुरेश धस यांना असणारच . त्यामुळे वादाची ठिणगी पडताच दोघेही भडकले . 

प्रश्नोत्तरानंतर नियम 260 अन्वये अमरसिंह पंडीत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेला सुरूवात केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरुन त्यांनी सरकारला चिमटे काढण्यास सुरुवात केली. याशिवाय सरकारने राबविलेल्या विविध योजनाचा समाचार घेत, त्या योजनेतून किती शेतकऱ्यांचा फायदा झाला तर किती शेतकऱ्यांना तो फायदा अद्याप मिळालेला नाही, याचा पाढा वाचला. यानंतर एकावर एक आरोपांच्या फैरी झाडून त्यांनी सरकारला धारेवर धरले. 

त्यांच्यानंतर चर्चेत सहभागी झालेले आमदार रामहरी रुपनवर यांचे बोलणे संपताच आमदार सुरेश धस यांनी चर्चेत सहभागी झाले. त्यांनी मराठवाडयातील शेतकऱ्यांना 50 हजार रूपये तर विदर्भात ती 18 ते 20 हजार नुकसान भरपाई मिळाल्याचे सांगितले. 

 अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व असलेल्या  जय भवानी साखर कारखान्याकडे असलेल्या ठेवीदार शेतकऱ्यांचे पैसेही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिले नसल्याचे नमूद केले. यावेळी थकबाकीदार संस्थांची यादी वाचत असतानाच अमरसिंह पंडित यांनी हरकत घेत सुरेश धस हे वैयक्तीक व्देषापोटी निवेदन करीत असल्याचे सांगितले. 

तसेच आक्रमक होत अमरसिंह पंडित यांनी सुरेश धस यांचे वर्चस्व असलेल्या आष्ठी दुध उत्पादक संघाने तरी शेतकऱ्यांचे पैसे कधी दिले ते सांगावे, असा टोला लगावला. यावरून दोन्ही सदस्यांमध्ये सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली.

 मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकांची वाट लावणारेच आता शेतकरयाच्या प्रश्नावर बोलत असल्याची टिप्पणी करित आगीत तेल ओतले. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अमरसिंह पंडित यांच्या विरोधात तक्रारी झालेल्या होत्या , ते प्रकरण आधी सहकार मंत्री राहिलेल्या चंद्रकांत दादांना लक्षात असावे . 

यानंतर अमरसिंहाच्या पंडीतांच्या बाजूने विरोधक आणि आमदार सुरेश धस यांच्या बाजूने सत्ताधारी एकवटल्याने सभागृहात गोंधळ सुरू झाला. आमदार पंडीत यांनी सभागृहात चर्चा करा असे आव्हान दिले, तर प्रत्युउत्तरात आमदार सुरेश धस यांनी आणखी पुरावे सादर करू, अशा शब्दात इशारा दिला. 

दोन्ही पक्षांना शांततेचे आवाहन करित अखेर  उपसभापती महोदयांनी सभागृह स्थगित केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com