Pandit Jawaharlal Nehru on Facebook & Twitter | Sarkarnama

शेवटी पंडित जवाहरलाल नेहरुच भाजपला उत्तर देण्यास अवतरले ! 

समीर सुर्वे 
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

..

मुंबई :भारताच्या सर्वच समस्यांचे मुळे 1947 पासून 1964 पर्यंत प्रधानमंत्री असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यपध्दीत असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. संसदेपासून,समाजमाध्यमांवरही नेहरुनांच जबाबदार धरले जात असताना कॉंग्रेसकडून निषेध नोंदविण्या पलिकडे काहीच होत नाही . 

 शेवटी पंडित नेहरुच मैदानात उतरले आहे. जवाहरला नेहरू यांच्या नावाचे एक   फेसबुक आणि ट्‌वीटर अकांऊट उघडण्यात आले आहे. जवाहरलाला नेहरु या नावाने फेसबुक अकांऊट सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु झाले आहे तर ट्‌वीटर अकांऊट मार्च महिन्यात सुरु झाले आहे. 

 

 

ट्‌वीटवर अकांऊटवर नेहरु फारसे सक्रिय नसले तरी फेसबुकवर धमाल उडवून दिली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अकांऊटवरुन चिमटे काढले जात आहेत . नरेंद्र मोदी यांना माझ्या सारखे व्हायचे आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था 1947 च्या काळात पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. सी.डी.दास हे माझ्य मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते पण त्यांनी कधी नव्या पिढीला ढासळलेल्या अर्थव्यवस्थेसाठी कारणं ठरवले नाही.असा टोला विद्यमान अर्थमंत्री निर्मला सिताराम यांना लगावण्यात आला.

आमच्या काळात अर्थसंकल्प दर महिन्याला सादर करण्याची प्रथा नव्हती असा चिमटाही काढला आहे.मी अनेक देशांना भेटी दिल्या पण करदात्यांच्या पैशांचा वापर मार्केटिंगसाठी केला नाही. त्यासाठी नेहरुंच्या काही परदेशी दौऱ्यातील गर्दीचे छायाचित्रही प्रसिध्द करण्यता आले आहे. अशा अनेक टपल्या आणि टिचक्‍या या फेसबुकवर वाचायला मिळतात.

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन ते तीन वर्षांपुर्वी भाजपच्या समर्थकांना सामाजमाध्यमांचा वापर प्रचारासाठी करण्यास सुरवात केली.भारतीय राजकरणात पहिल्यांदाच एकाद्या पक्षाचे समर्थक अशा प्रकारे आक्रमक पणे स्वत:च्या नेत्यांची प्रसिध्दी करताना विरोधकांवर हल्ला चढवत होते. ही पध्दत इतर कोणत्याही पक्षाला वापरता आली नाही.भाजपने 2014च्या  लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर या प्रचाराचे महत्व सर्वच पक्षांन समजले. मात्र,पुढील दोन ते तीन वर्ष त्यांना पुरेपुर वापरही करता येत नव्हता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख