बीडमध्ये युवा नेते धस -क्षीरसागर -पंडितांची  दोस्ती  तुटायची नाय ! - Pandit- Dhas - kshirsagar will their friendship last for ever ! | Politics Marathi News - Sarkarnama

बीडमध्ये युवा नेते धस -क्षीरसागर -पंडितांची  दोस्ती  तुटायची नाय !

दत्ता देशमुख :  सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

बीड : राजकारणाच्या पटावरील डावपेचांची जागा आता वैयक्तिक हेवेदावे आणि खुन्नसी वृत्तीने घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अगदी एकमेकांच्या सुख-दुःखापासून दूर राहण्यात देखील नेत्यांना आता गैर वाटत नाही. 

अशात बीड जिल्ह्यातील राजकारण्यांच्या तिसऱ्या पिढीतले जयदत्त धस, युध्दजीत पंडीत आणि डॉ. योगेश क्षिरसागर यांनी मात्र आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी दोस्ती पक्की असल्याची प्रचिती दिली आहे. 

बीड : राजकारणाच्या पटावरील डावपेचांची जागा आता वैयक्तिक हेवेदावे आणि खुन्नसी वृत्तीने घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अगदी एकमेकांच्या सुख-दुःखापासून दूर राहण्यात देखील नेत्यांना आता गैर वाटत नाही. 

अशात बीड जिल्ह्यातील राजकारण्यांच्या तिसऱ्या पिढीतले जयदत्त धस, युध्दजीत पंडीत आणि डॉ. योगेश क्षिरसागर यांनी मात्र आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी दोस्ती पक्की असल्याची प्रचिती दिली आहे. 

सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या वाढदिवसा निमित्त हे तीन मित्र आष्टीत पक्षभेद दुर सारत एकमेकांच्या हातात घालून वावरत होते. युवानेत्यांची ही नवी पिढी जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणाने साठी पार केली आहे. काही राजकीय घराण्यातली दुसरी तर अनेकांची तिसरी पिढी राजकीय आखाड्यात उतरतांना दिसते आहे. बीडच्या साठ  वर्षाच्या राजकारणात पहिल्या, दुसऱ्या पिढीपर्यंत एकमेकांना नामोहरम करण्यासाठी राजकीय डावपेच आखले जायचे. अनेकदा राजकीय संघर्ष रक्तरंजित वळणही घ्यायचा . 

 आपल्याच पक्षातील नेत्याच्या वाटेत राजकीय अडथळा आणण्यापासून ते त्याला पराभूत करण्यापर्यंतचे डावपेच खेळले जायचे. राजकारणातील 45 वर्षे कॉंग्रेस आणि नंतरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांना या डावपेचांच्या अग्नीदिव्यांतून जावे लागले.

 दिवंगत केशरबाई क्षीरसागर, सुंदरराव सोळंके आणि आताच्या जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित या नेत्यांना देखील पक्षीय डावपेचातून पराभव स्वीकारावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

 वर्षामागून वर्ष सरली, राजकारणात नवी पिढी आली तशा राजकारणाचा बाज देखील बदलला. राजकीय डावपेचांची जागा आता खुन्नस आणि काट्याने काटा काढण्याच्या वृत्ताने घेतली आहे. त्यामुळे राजकारणातील दिलदार शत्रू ही संकल्पानाच लोप पावते की काय? असे वाटायला लागले आहे. 

पण, राजकारणातील तिसऱ्या पिढीतीच्या युवा नेत्यांनी मात्र याला छेद देत मैत्री जपण्याला प्राधान्य दिल्याचे दिसते. पक्ष वेगळे असले तरी मैत्रीचा धागा पक्का ठेवण्याचा प्रयत्न जिल्ह्यीतील युवा राजकारणी करतांना दिसतायेत. 

माजी मंत्री सुरेश धस यांचे जेष्ठ चिरंजीव जयदत्त धस यांच्या वाढदिवसा निमित्त युध्दजीत बदामराव पंडीत, योगेश भारतभूषण क्षीरसागर हे तिघे नुकतेच आष्टीला एकत्र आले होते. 

जयदत्त धस यांना शुभेच्छा देण्यासाठी गेवराईहून सभापती युद्धाजित पंडित तर बीडहून डॉ. योगेश क्षीरसागर आष्टीत दाखल झाले. विशेष म्हणजे हे दोघे येईपर्यंत वाढदिवस साजरा न करण्याच निर्णय जयदत्त धस यांनी घेतला होता. अखेर ते आल्यावरच वाढदिवसाचा केक कापून तो ऐकमेकांना भरवत भविष्यातील या राजकारण्यांनी आपल्या मैत्रीचे नाते घट्ट केले.
 
सध्या या तीन्ही युवा नेत्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या पक्षीय विचारधारा वेगळ्या आहेत. जयदत्त यांचे वडील सुरेश धस राष्ट्रवादीतून बाहेर पडले असून भाजपच्या वाटेवर आहेत.

 तर डॉ. योगेश क्षीरसांगर यांचे वडील डॉ. भारतभूषण हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असून नगराध्यक्ष आहेत. पण सध्या त्यांचे पक्षात मन स्थिर नसल्याने ते भविष्यात काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. 

युध्दजीत यांचे वडील बदामराव पंडीत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधून घेतले. पण शिवसेनेत असले तरी पंडीत पिता-पुत्रांची भाजपशी वाढती जवळीक वेगळेच संकेत देते. 

अशा वेळी या राजकारण्याचे वारसदार कोणत्या पक्षाची वाट धरतात याची उत्सूकता जिल्ह्यातील विशेषता तरुण वर्गाला अधिक आहे. सध्या तरी या तिन्ही युवा नेत्यांचा कल हा सत्ताधारी भाजपकडेच असल्याचे बोलले जाते. 

बीड, आष्टी - पाटोदा आणि गेवराई या तीन मतदार संघाचे एकमेकांशी घट्ट नाते आहे. योगेश क्षीरसागर यांच्याकडे बीड मतदारसंघाचे वारस म्हणून बघितले जाते. 

गेवराईचा बराचसा भाग बीड शहरा जवळ आहे. तर, आष्टी मतदार संघातील शिरुर तालुक्‍याचा भाग बीड मतदार संघात येतो. याच मतदार संघात जुन्या गेवराई मतदार संघातील गावे असल्याने भविष्यात तिघांनाही एकमेकांची साथ लागणार आहे.

राजकारणात धस , क्षीरसागर ,पंडितांची कधी एकमेकांना मदत तर कधी विरोध हे भविष्यात घडेलही पण  पण या युवा नेत्यांची    दोस्ती  तुटायची नाय एव्हढे मात्र नक्की !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख