pandit and bansode at beed politics | Sarkarnama

मला आमदार आणि मंत्री करण्यात अमरसिंह पंडित यांचा मोठा वाटा : संजय बनसोडे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या पुढाकाराने होत असलेल्या शिवजन्मोत्सव सप्ताहाचे उद्‌घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. समाजपयोगी उपक्रम घेऊन शिवजयंती साजरी कारणारा हा गेवराईचा विजयसिंह पंडित पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवला जावा असेही श्री. बनसोडे म्हणाले. 

बीड : पंडित परिवाराचे काम फार मोठे आहे. निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा विजयसिंह पंडित खचले नाहीत तर लोकांसाठी पुन्हा उभे राहिले. मला आमदार आणि मंत्री करण्यासाठी अमरसिंह पंडित यांचा वाटा प्रचंड आहे. पंडित परिवाराने मला तिकीट मिळवून दिले नसते तर मी मंत्री झालो नसतो, मी मंत्री म्हणजे अमरसिंह पंडित मंत्री असे सांगत गेवराई तालुक्‍यासाठी कांही कमी पडू देणार नाही असे विजयाचे गुपित आणि मंत्रिपद मिळण्यामागचे इंगित राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उघड केले. 

 

निमित्त होते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव सप्ताहाच्या उद×घाटनाचे. आमदार बाळासाहेब आजबे, व्याख्याते अमोल मिटकरी, संयोजक विजयसिंह पंडित यांची उपस्थिती होती. श्री. बनसोडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच आम्ही पुढे चालत आहोत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारे देशातले एकमेव नेते म्हणजे शरद पवार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई सह बीड जिल्ह्यात मोठे काम आम्ही करु. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख